येवला (प्रतिनिधी)
क्रांतिसूर्य म.ज्योतिबा फुले यांनी धार्मिक मक्तेदारी,एकाधिकार शाही, अनिष्ठ प्रथा-परंपरा,चालीरीती,स्त्री-शूद्रांना पुरोहित,पाखंड,वर्ग-वर्णव्यवस्था यातून मुक्त करण्यासाठी सामाजिक सुधारणांचा आग्रह धरून २४ सप्टेंबर १८७४ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.फुलेंनी केलेली सत्यशोधक समाजाची स्थापना म्हणजे धार्मिक सुधारणांचा पाया व मानव मुक्तीचे पहिले पाऊल होते असे मत शरद शेजवळ यांनी व्यक्त केले.भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय,राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिका येवला येथे सत्यशोधक समाज स्थापना दिन साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश खळे होते.
शुभांगी मढवई,बी.डी.खैरनार,राजरत्न वाहुळ यांनी ह्यावेळी महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या विचार कार्याला उजाळा दिला.कार्यक्रमास अधीक्षक बी.डी.खैरनार,नवनाथ उंडे,विश्वास जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता जाधव यांनी तर आभार राजरत्न वाहुळ यांनी मानले.दीपाली वाहुळ,ललित भामरे,रोहित गरुड,साहिल जाधव,सचिन गरुड,अजित काळे,प्रमोद वाघ,जीवन दळे,शिवम मोरे,पंकज घुले,सोन्याबापू आहेर,शिवम मोरे आदी विद्यार्थी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.