संगमनेर : काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते तथा राज्याचे माजी महसूलमंत्री आ.बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने सरकारमधून मोठा निधी मिळवत संगमनेर तालुक्यातील वाडी वस्तीवर विकासाच्या योजना राबवल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून २०२२- २३ अंतर्गत रस्ते विकास व मजबुतीकरण करण्यासाठी १ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना इंद्रजीत थोरात म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात विकास कामांचा वेग कायम आहे. संगमनेर तालुका विस्ताराने मोठा असून तालुक्यातील १७१ गावे व २५० च्या पुढे वाड्या वस्त्या आहेत.महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे कालव्याच्या कामाला गती देऊन हे काम रात्रंदिवस सुरू ठेवले होते. ऑक्टोबर २०२२ मध्येच दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या शेतात निळवंडेचे पाणी आणण्याचे ध्येय आमदार बाळासाहेब थोरात यांनी ठेवले होते. याचबरोबर तालुक्यातील विकास कामांसाठी मोठा निधी मिळवला होता. मात्र सरकार बदलले आणि विकास कामांना काहीशी स्थगिती मिळाली होती.तरीही आपल्या विकास कामांचा पाठपुरावा ठेवत आमदार बाळासाहेेब थोरात यांनी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०२२- २३ मधून अंभोरे ते रणखांबवाडी रस्त्याची सुधारणा व मो-यांचे बांधकाम करणे करीता ५० लाख रुपयांचा निधी, घुलेवाडी गावांतर्गत कानिफनाथ मंदिर ते शंकर टाऊनशिप रस्ता सुधारणे करता १४ लाख, तळेगाव दिघे ते धनगरवाडी रस्ता सुधारण्यासाठी २५ लाख रुपये, मालुंजे ते हंगेवाडी रस्त्याचे डांबरीकरण करणेसाठी १० लाख आणि संगमनेर ते घुलेवाडी ग्रा.मा.२१ रस्ता, साई श्रद्धा चौक ते कानिफनाथ मंदिर चौक सुधारणा करणेसाठी ३५ लाख असे १ कोटी ३२ लाख रुपयांचा निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.वरील कामे तातडीने सुरू होणार असल्याने अंभोरे, रणखांबवाडी, घुलेवाडी ,तळेगाव ,धनगरवाडी, मालुंजे, हंगेवाडी, साईश्रद्धा चौक, या परिसरातील नागरिकांनी राज्याचे नेते व माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे अभिनंदन केले आहे.