*परीपाठ/पंचाग/दिनविशेष 

0
*सौ . सविता देशमुख उपशिक्षिका पाताळेश्वर विद्यालय पाडळी ता सिन्नर* *7972808064*

               

दिनांक :~ 24 डिसेंबर 2022 *वार ~ शनीवार* 

*आजचे पंचाग* 

*पौष. 24 डिसेंबर*

*तिथी : शु. प्रतिपदा (शनी)*   

*नक्षत्र : पूर्वाशाढा,*

*योग :- वृध्दी*

*करण : बालव*

*सूर्योदय : 06:59, सूर्यास्त : 05:50,*

*सुविचार* 

*असत्य असे कर्ज आहे*

*ज्या मुळे तात्काळ सुख मिळते*

*परंतु आयुष्य भर त्याची*

*परतफेड करावी लागते*

*म्हणी व अर्थ* 

*अन्नाचा येते वास, कोरीचा घेते घास.*

*अर्थ:- अन्न न खाणे,पण त्यात मन असणे.*

*दिनविशेष*     

*या वर्षातील 358 वा दिवस आहे.*

*महत्त्वाच्या घटना* 

*१९०६: रेजिनाल्ड फेसेंडेन यांनी प्रथमच एक कवितावाचन, व्हायोलिनवादन आणि एक भाषण यांचे रेडिओ प्रक्षेपण केले.*

*१९१०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची व काळ्यापाण्याची शिक्षा.*

*१९४३: दुसरे महायुद्ध – जनरल ड्वाईट आयसेनहॉवर हे दोस्त राष्ट्रांच्या फौजांचे सरसेनापती बनले.*

*१९९९: काठमांडू येथून नवी दिल्लीला येणार्‍या इंडियन एअरलाइन्स फ्लाईट ८१४ या विमानाचे तालिबानी अतिरेक्यांनी अपहरण करुन ते विमान अफगणिस्तानातील कंदाहार येथे नेले.*

*२०१६: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवस्मारकाचे जलपूजन आणि भूमिपूजन करण्यात आले.*

*जन्मदिवस / जयंती*

*१८८०: स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९५९)*

*१८९९: नामवंत साहित्यिक, बालसाहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरूजी यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून १९५०)*

*१९१०: हेल्वेस्टिका फॉन्ट निर्माते मॅक्स मिईदींगर यांचा जन्म. (मृत्यू: ८ मार्च १९८०)*

*१९२४: पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जुलै १९८० – मुंबई)*

*१९४२: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार इंद्र बानिया यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च २०१५)*

*१९५९: हिन्दी चित्रपट कलाकार अनिल कपूर यांचा जन्म.*

*मृत्यू / पुण्यतिथी*

*२००५ : भानुमती रामकृष्ण – तामिळ व तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती, गीतकार, संगीतकार, गायिका व लेखिका (जन्म: ७ सप्टेंबर १९२५)*

*१९८७ : एम. जी. रामचंद्रन – अभिनेते व तामिळनडुचे मुख्यमंत्री (जन्म: १७ जानेवारी १९१७)*

*१९७७ : नलिनीबाला देवी – आसामी कवयित्री व लेखिका (जन्म: २३ मार्च १८९८)*

*१९७३ : पेरीयार ई. व्ही. रामस्वामी – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते (जन्म: १७ सप्टेंबर १८७९)*

*१५२४ : वास्को द गामा – पोर्तुगीज दर्यावर्दी. अफ्रिकेला वळसा घालून युरोपातुन भारतात येण्याचा मार्ग त्याने शोधला. (जन्म:  १४६९)*

*सामान्य ज्ञान* 

*उष्णतेचा मंदवाहक पदार्थ कोणता?* 

*लाकूड, रबर, काच*

*ए.आर.रहेमान हे नाव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?* 

*संगीत क्षेत्र*

*इंग्लंड या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता?* 

*क्रिकेट*

*भारताच्या पूर्व सरहद्दीवरील देशाचे नाव सांगा?* 

*बांगलादेश व म्यानमार*

*भारतातून सर्वात शेवटी निघून जाणारे परकीय कोण होते?* 

*पोर्तुगीज 1961*

*बोधकथा* 

*प्रेमळ कथा,*

एका शहरा जवळील खेड्या मध्ये एक वृद्ध माणूस राहत होता, त्याची इच्छा होती कि घरासमोरील अंगणात बटाट्याची लागवड व्हावी, पण हे खूप कष्टाचे काम आहे, …….. आणि दुर्दैवाने त्याचा मुलगा तुरुंगात होता, त्यामुळे हे कसे होणार, असे म्हणून तो आपल्या मुलाला एक पत्र लिहितो, राजू,तुझ्या स्वर्गवासी आईची इच्छा होती कि आपल्या अंगणात बटाट्याची लागवड व्हावी, पण त्यासाठी सारे आंगण खोदावे लागणार, मी तर थकलो आहे, तू इथे असतास तर मदत झाली असती दोनच दिवसात त्या वृद्ध माणसाला त्याच्या मुलाकडून पत्र आले, बाबा, कृपया करून तुम्ही आपले आंगण खोदू नका, तिथे मी पिस्तुल व कार्तुस लपविली आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्ण शहरातील पोलीस गावामध्ये दाखल झाली, त्यांनी पूर्ण आंगण खोदले पण त्यांना काहीच मिळाले नाही. लगेच मुलाचे पत्र आले,   बाबा आंगण खोदून झाले, आता तुम्ही बी पेरा व बटाट्याची मोठी बाग आपल्या अंगणात फुलवा  ………… इथे बसून मी तुमच्यासाठी सर्वोत्तम म्हणजे हेच करू शकतो.

*तात्पर्य :- मनापासून काहीही करायचे ठरविले तर ते नक्की होते, मग तुम्ही दुसर्या गावी असूद्यात किंवा परदेशात असूद्यात.*

*मुख्याध्यापक :- पाताळेश्वर विद्यालय पाडळी, ता. सिन्नर* 

*सचिव:- बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर,*सचिव :- प. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे.*

*सौ . सविता देशमुख उपशिक्षिका पाताळेश्वर विद्यालय पाडळी ता सिन्नर* *7972808064*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here