उरण तालुका युवक काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी नितेश पाटील.

0

उरण दि 24 (विठ्ठल ममताबादे ) काँग्रेस पक्षाचे निष्ठेने , प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या,पक्षाचा तळागाळात प्रचार व प्रसाराचे कार्य करणाऱ्या उरण तालुक्यातील पाणदिवे गावचे सुपूत्र नितेश गजानन पाटील यांची निवड उरण तालुका युवक काँग्रेस अध्यक्षपदी करण्यात आली आहे. शेलघर येथील एका कार्यक्रमात रायगड जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र घरत यांनी नितेश पाटील यांना नियुक्ती पत्र दिले.नितेश पाटील हे ग्रुप ग्रामपंचायत पाणदिवे पिरकोन मधील वार्ड क्रमांक 3 मधील ग्रामपंचायत सदस्य आहेत. ग्रामपंचायत निवडणुक 2022 च्या निवडणुकीत ते भरघोस मतांनी विजयी झालेले उमेदवार आहेत. काँग्रेस पक्षासाठी रात्रंदिवस कार्यरत असणाऱ्या नितेश पाटील यांची उरण तालुका युवक काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here