कोपरगांव :- दि. २४ सप्टेंबर २०२२
तालुक्यातील श्रीक्षेत्र चासनळी येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी जगदंबा देवी नवरात्र उत्सवानिमीत्त २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोंबर पर्यंत ह भ प बाबुराव महाराज चांदगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज सायंकाळी ७ ते ९ या वेळेत किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यांत आले आहे तरी जास्तीत जास्त भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यांत आले आहे.
ह. भ. प. हर्षद महाराज थोरात पाटोदा (२६ सप्टेंबर) ह. भ. प. बाबुराव महाराज चांगदुडे चासनळी (२७ सप्टेंबर), सौ. सुनिता चांदगुडे नाशिक यांच्या सहकार्याने तिचा प्रवास निर्मीत माधुरी शिरसाठ प्रस्तृत जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रम दुपारी ३ ते ५ तर ह भ प. शांताराम महाराज गाडेकर सिन्नर (२८ सप्टेंबर), ह. भ. प. बबन महाराज गव्हाणे अंजनापुर (२९ सप्टेंबर), ह. भ. प. दिलीप महाराज डहाळे मढी (३० सप्टेंबर), ह. भ. प. कल्याण महाराज पवार झोळे आश्रम (१ ऑक्टोंबर), ह. भ. प. श्रीराम महाराज गाडेकर अंजनापुर (२ ऑक्टोंबर), होम हवन पुर्णाहुती व भारूडाचा कार्यक्रम ह.भ. प. रामकृष्ण महाराज व सहकारी संभाजीनगर (३ ऑक्टोंबर), ह. भ. प. भरत महाराज चांदगुडे डवाळा आश्रम वैजापुर (४ ऑक्टोंबर) तर ५ ऑक्टोंबर रोजी ह. भ. प. बाबुराव महाराज चांदगुडे यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसाद वाटप होईल. नवरात्र उत्सव यशस्वी करण्यासाठी चासनळी ग्रामस्थ, ज्ञानेश्वर भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ, युवक युवती मंडळ व त्यांचे सर्व सहकारी प्रयत्नशिल आहेत. या नवरात्र उत्सव काळात पहाटे काकडा, दुर्गा सप्तशती ग्रंथ सामुदायीक पारायण, देवी भागवत ग्रंथावर प्रवचन, हरिपाठ व रात्री प्रहारा हरीजागर कार्यक्रम नित्यनियमाने होतील.