सातारा : मानवाचे जीवन सुखकर होण्यासाठी हार-जीत न मानता खिलाडूवृत्तीने राहिले पाहिजे. तरच जीवन सुखकर होण्यास मदत होते.असे आवाहन अनिल वीर यांनी केले.
लोकमंगल हायकुल,नागेवाडी – कुशी येथे क्रीडा स्पर्धाचे उदघाटन अनिल वीर यांच्या हस्ते करण्यात आले.तेव्हा ते मार्गदर्शन करीत होते.अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक – अध्यक्ष शिरीष चिटणीस होते.प्रारंभी,मान्यवरांचा सत्कार पुस्तक देऊन करण्यात आला.
अनिल वीर म्हणाले, “सहशालेय उपक्रमात खेळास अनन्यसाधारण महत्व आहे.तेव्हा अध्ययनार्थीं यांनी नियमित खेळ, व्यायाम,आहार-विहार वेळेवर व नियमित केला पाहिजे. माध्यमिक स्तरांवरील मिळालेली शिक्षणाची शिदोरी आयुष्यभर मिळत असते. अभ्यासक्रम हा परीक्षेत फक्त गुण घेण्यासाठी नसतो.तर जीवन जगण्यासाठी व्यवहारात उपयोग केला तरच खऱ्या अर्थाने जीवनाचे सोने होते.जीवनास आकार येत असतो.तेव्हा गुरुजनांनी दिलेले ज्ञान आत्मसात करावे.”
अध्यक्षस्थानावरून बोलताना शिरीष चिटणीस म्हणाले,”भारत आणि त्या विरोधी भूमिका घेणारे अफगाणिस्थान सारखे देश मुलींच्या शिक्षणावर निर्बंध लावतात. त्यामुळे आपल्या मुली शिक्षणासह खेळात प्राविण्य मिळवतात.भारतातील महाराष्ट्र व महाराष्ट्रातील पश्चिम विभाग खरोखरच सुदैवी आहे.”
क्रीडाशिक्षक शशिकांत जाधव यांनी प्रास्ताविक केले.शशिकांत जमदाडे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापिका श्रीमती विद्या बाबर यांनी आभारप्रदर्शन केले. सदरच्या कार्यक्रमास दिलीप सावंत,राहुल घोडके,दत्तात्रय सावंत,भगवान जाधव,रमेश महामुलकर,शिक्षक,विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.