उरण दि 25(विठ्ठल ममताबादे ) : मुंबई चर्च गेट, आय. एम सी येथे झालेल्या महाराष्ट्र लोक कल्याण सेवा संस्था व अमरदीप बाळ विकास फाऊंडेशन याच्या विद्यमाने आसनास हेल्थकेअर एज्युकेशन फाऊंडेशन याच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अनमोल रत्न अवॉर्डने अनेकांना सन्मानित करण्यात आले. विविध क्षेत्रातील भरीव कामगिरी करणाऱ्यांना एकूण देशातून 80 जणांना सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये उरण तालुक्यातील सारडे गावामधील गोपाळ दिनकर म्हात्रे यांना सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार देण्यासाठी पदमश्री डॉ रमाकांत देशपांडे, पदमश्री डाँ मुकेश बात्रा,अभिनेता कायवंत सावरकर,हौडो होंग राजदूत कोरिया,आणतोन पाषको राजदूत बेलारुस,डॉ अमजद खान पठाण,एन. डी खान,सलमा खान इत्यादी मान्यवर उपस्थित होते.आंतरराष्ट्रीय कराटे प्रशिक्षक गोपाळ म्हात्रे यांना अनमोल रत्न राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर विविध क्षेत्रातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सुरेगाव : एका अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अंदाजे ५ ते ६ वर्षीय असलेल्या मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह पांढऱ्या रंगाच्या कापडात गुंडाळून गोदावरी नदीत...
महाबळेश्वर : महाबळेश्वर येथील लॉडविक पॉईंट परिसरात गुरुवारी सायंकाळी एकाने चारशे फूट खोल दरीत उडी मारून आत्महत्या केली. संजय वेलजी रुघानी असे आत्महत्या केलेल्या...
सातारा, दि. 20 : कोरेगांव तालुक्यात मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देणेसाठी अधिनस्त कार्यालयामध्ये सदर नोंदीचे अभिलेख तपासणी करून ज्या अभिलेख्यानुसासर नोंदी आढळल्या आहेत. त्याची...