किराणा दुकानदार आनंद लखमीचंद देसर्डा याच्या विरोधात गुन्हा दाखल देवळाली प्रवरा /राजेंद्र उंडे
महसुल विभागाच्या पथकास गुप्त खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहिती नुसार पथकाने महाराष्ट्र शासनाचे कोणतेही बिल पावती परवाना नसताना काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने अवैधरित्या साठवून ठेवलेला तांदुळाचा साठा देवळाली प्रवरा येथिल खंडोबा मंदिरा समोरील राजळे वस्तीवरील एका खोलित सापडला असुन महसुल विभाने या तांदळाचा पंचनामा करुन जप्त केला आहे. सुमारे सहा टन तांदुळ पकडण्यात आला.राञी उशिरा पर्यंत येथिल किराणा दुकानदार आनंद लखमीचंद देसर्डा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,देवळाली प्रवरा येथिल किराणा दुकानदार आनंदा लखमीचंद देसर्डा याने खंडोबा मंदिरा समोरील राजळे वस्तीवर भाडोञी खोल्या घेवून या खोल्यात रेशनचा तांदुळ साठविण्यात आला होता. बुधवारी राञी या ठिकाणी एक मालट्रक शासकीय गोण्यातील रेशनचा तांदुळ खाली करण्यासाठी आला होता. हा ट्रक पुरवठा विभागातील ठेकेदाराने आणला होता असे समजते. हा ट्रक खाली करण्यापूर्वीच नगर येथिल गुन्हे अन्वेशषन पथकाने धाड मारली. पहाटे मालट्रक मालक व किराणा दुकानदार आणि पुरवठा ठेकेदार यांनी मोठी तडजोड करुन शासकीय गोण्यासह तांदुळाने भरलेला ट्रक काही वेळातच गायब करण्यात आला.या ट्रकचे छायचिञण अज्ञात व्यक्तीने केले. ते छायचिञन राहुरीचे तहसिलदार यांना पाठविण्यात आले होते.तहसिलदार एफ.आर. शेख यांनी दखल घेवून नायब तहसिलदार सचिन औटी, पुरवठा निरीक्षक ज्योती सगभोर,अविनाश ओहळ,मंडलधिकारी बाळकृष्ण जाधव,तलाठी दिपक साळवे,गोडावून प्रमुख राहुल जाधव आदींचे पथक पाठवून रेशनच्या तांदुळ प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.
नायब तहसिलदार सचिन औटी यांच्या पथकाने देवळाली प्रवरा येथिल खंडोबा मंदिरा समोरील राजळे वस्तीवर आनंद लखमीचंद देसर्डा याने साठवून ठेवलेला तांदुळाच्या ठिकाणी छापा टाकून सुमारे सहा टन तांदुळ जप्त केला आहे.दुपारी 12 वाजता सुरु झालेली कारवाई सायंकाळ पर्यंत सुरु होती.राहुरी येथिल पुरवठा विभागाच्या वतीने बोलविण्यात आलेल्या ट्रक मध्ये तांदुळ भरुन राहुरी येथे नेण्यात आला. पुरवठा विभागाने अंदाजे सहा ते सात टन तांदुळ असण्याची शक्यता वर्तविली आहे.सुमारे दिड लाख रुपये किमतीचा तांदुळ असण्याची शक्यता आहे.राञी उशिरा पर्यंत याबाबत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.
बुधवारी सकाळी शासकीय गोण्यात भरलेल्या तांदळासह एक ट्रक राजळे वस्ती येथे उभा होता.या दरम्यान पाच ते सहा तरुण एका व्यक्तीस मारहाण करीत होते. शेवगाव येथिल पुरवठा विभागाचा ठेकेदार जाधव व राहुरी येथिल पुरवठा विभागाचा ठेकेदार यांच्यात ठेकेदारीवरुन वाद उफळून आल्याने ट्रक मधील रेशनचा तांदुळ पकडला गेला. परंतू पहाटच्या अंधारात लाखो रुपयाची तडजोड करण्यात आल्याची चर्चा शहरात सुरु होती.
चौकट
रेशनचा तांदुळ सापडला, गुन्हा दाखल करणार ; तहसिलदार शेख
देवळाली प्रवरा येथे रेशनचा तांदुळ पकडला आहे.तांदुळ जप्त केलेला आहे.तांदुळाचे वजन करुन करुन त्याची किमंत काढुन पोलिसात तक्रार फिर्याद दाखल करण्यात येणार आहे.रेशनच्या तांदुळ साठा व काळ्या बाजारात विक्री करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे तहसिलदार एफ.आर. शेख यांनी सांगितले.
एल.सी.बी.चे पथक खरे की खोटे?
देवळाली प्रवरा येथिल किराणा व्यापारी आनंद देसर्डा याने राजळे वस्ती येथिल एका खोलित रेशनचा तांदुळ साठवला होता.बुधवारी पहाटे शासकीय गोण्यात भरलेला तांदळाचा ट्रक या ठिकाणी आलेला होता. त्या नंतर काही वेळात एलसीबीचे पथक (खरे की खोटे) आले त्यांनी त्या दरवाजा तोडून तांदुळाची पहाणी करुन ट्रक मधील तांदुळासह पोलिस स्टेशनला घ्या असे सांगितले.या ठिकाणी शेवगाव येथिल रहिवाशी असलेला पुरवठा विभागाचा ठेकेदार जाधव नामक व किराणा व्यापारी देसर्डा, मालट्रक मालक यांनी तडजोड करुन लाखो रुपये या पथकास देवून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. आलेले एलसीबीचे पथक खरे होते की खोटे होते परंतू त्यांनी सहा लाखा पेक्षा जास्त रक्कम घेवून निघून गेले. ते कोण होते याचा फिर्याद दाखल झाल्या नंतर पोलिस घेतील का?
राहुरीच्या पुरवठा विभागातील ती व्यक्ती महसुलच्या छाप्यात
बुधवारी पहाटे शासकीय गोण्यात भरलेला तांदुळ आनंद देसर्डा यांच्या गोडावून मध्ये बारदाना बदलून खाली करत असताना पुरवठा विभागातील गोडावून विभागात काम करणारी व्यक्ती उपस्थित होती. तांदुळाने भरलेल्या ट्रकचे छायचिञ तहसिलदार शेख यांना मिळाल्या नंतर त्यांनी पथकास छापा टाकण्याचे आदेश दिले असता या पथकात पुरवठा विभागातील गोडावून मधील व्यक्ती उपस्थित असल्याने उपस्थित किराणा दुकानदार व इतर काही व्यक्तींनी हि ट्रक सोबत होती. तीच व्यक्ती छापा टाकण्यासाठी आली आहे. यावरुन हि वरुन हि पुरवठा विभागाची मिली भगत आहे का? असा अनेकांनी प्रश्न केला.