देशमुखनगर : पुणे बेंगलोर महामार्गवर नागठाणे गांवच्या हद्दीत अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एकजण ठार झाला. संतोष पोपटराव रणसिंग वय ४५ मुळ राहणार वाघोली ,ता कोरेगांव सध्या राहणार बोरगांव ता. सातारा असे ठार झालेल्या इसमाचे नांव आहे.
बोरगांव पोलीस ठाणेतुन मिळालेल्या माहिती नुसार मयत संतोष रणसिंग हा दि. २८ रोजी सायंकाळी ६ वाजता कामासाठी जातो म्हणून घरातुन बाहेर पडला होता. तो रात्री १ वाजणेचे सुमारास परत येताना महामार्ग ओलांडत असताना सातारा ते कराड जाणारे लेनवर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ठार झाला. वाहनाची धडक इतकी जबरदस्त होती की संतोष याचा मृतदेह पुर्णपणे छिन्नविच्छिन्न झाला होता.
मंगेश दिलिप तांबोळी यांनी बोरगांव पोलीस ठाणेत अपघाताची खबर दिली असुन पुढील तपास ए पी आय चेतन मछले करत आहेत.