*दिनांक :~ 30 डिसेंबर 2022* *वार ~ शुक्रवार*
*आजचे पंचाग*
*पौष. 30 डिसेंबर*
*तिथी : शु. अष्टमी (शुक्र)*
*नक्षत्र : उ. भाद्रपदा,*
*योग :– वरियान*
*करण : बालव*
*सूर्योदय : 06:58, सूर्यास्त : 05:52,*
*सुविचार*
*सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून वेळ आल्यावर कृती करण्याची गोष्ट आहे. *म्हणी व अर्थ*
*गरीबानं खपावं, धनिकानं चाखावं._
*अर्थ:-* _गरीबाने कष्ट करावेत आणि श्रीमंतांने माल खावा._
*दिनविशेष*
या वर्षातील 364 वा दिवस आहे.
*महत्त्वाच्या घटना*
*१९४३ : सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला_
*१९२४ : एडविन हबलने आकाशगंगेखेरीज इतर दीर्घिकाही अस्तित्त्वात असल्याचे जाहीर केले._
*१९०६ : ऑल इंडिया मुस्लिम लीगची ढाक्का येथे स्थापना. या घटनेतच भारताच्या फाळणीची बीजे रोवली गेली._
*१८०३: ला ब्रिटन च्या इस्ट इंडिया कंपनी ने दिल्ली,आग्रा आणि भरूच वर आपले नियंत्रण सुरु केले_
*जन्मदिवस / जयंती*
*१९०२ : डॉ. रघू वीरा – भाषाशास्त्रज्ञ, जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, घटनासमितीचे सदस्य, राज्यसभा खासदार, वैदिक संस्कृत, तिबेटी, चिनी, मंगोलियन इत्यादी भाषांचे जाणकार (मृत्यू: १४ मे १९६३)_
*१८७९ : वेंकटरमण अय्यर तथा योगी रमण महर्षी – भारतीय तत्त्ववेत्ते (मृत्यू: १४ एप्रिल १९५०)_
*१८८७ : डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी – मुंबईचे पहिले गृहमंत्री, हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एंजट जनरल, नामवंत साहित्यिक आणि ‘भारतीय विद्याभवन’चे संस्थापक (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९७१)_
*१८६५ : रुडयार्ड किपलिंग – नोबेल पारितोषिकविजेते ब्रिटिश लेखक (मृत्यू: १८ जानेवारी १९३६)_
*मृत्यू / पुण्यतिथी*
*२००६ : इराकी हुकूमशहा व इराकचे ५ वे अध्य्क्ष सद्दाम हुसेन यांना फाशी (जन्म: २८ एप्रिल १९३७)_
*१९८७ : दत्ता नाईक ऊर्फ ’एन. दत्ता’ – संगीतकार_
*१९८२ : दत्ता उर्फ दादा धर्माधिकारी – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक (सतीची पुण्याई, धाकटी मेहुणी, भक्त पुंडलिक, नसती उठाठेव, मुझे सीने से लगा लो, सतीचे वाण, थांब लक्ष्मी कुंकू लावते, वैशाख वणवा, सुभद्रा हरण, क्षण आला भाग्याचा, सप्तपदी इ. अनेक चित्रपट) (जन्म: २ डिसेंबर १९१३ – कोल्हापूर)_
*१९७४ : आचार्य शंकरराव देव – गांधीवादी कार्यकर्ते_
*१९७१ : डॉ. विक्रम साराभाई – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १२ ऑगस्ट १९१९)_
*१९४४ : रोमें रोलाँ – साहित्यातील नोबेल पारितोषिक (१९१५) विजेते फ्रेन्च लेखक, नाटककार व संगीत समीक्षक (जन्म: २९ जानेवारी १८६६)_
*१६९१ : रॉबर्ट बॉईल – आयरिश रसायनशास्त्रज्ञ (जन्म: २५ जानेवारी १६२७)_
*सामान्य ज्ञान*
*भारतीय तिरंगा मधील अशोक चक्रात किती आरे असतात?_
*24 आरे*
*BSNL चे संक्षिप्त (पूर्ण) रूप काय आहे?
*भारतीय संचार निगम लिमिटेड*
*समाज सुधारक आण्णा हजारे यांचे गाव कोणते आहे?
*राळेगण सिद्धी*
*सध्या सुरू असलेला मराठी महिना कोणता आहे?
*पौष*
*अर्थशास्त्राचे जनक कोण आहे?
*एडम स्मिथ*
*बोधकथा* *मनःशांती *
एकदा भगवान विष्णूंनी ठरविले की, आज जो जे मागेल ते त्याला द्यायचे. सर्वांच्या इच्छा पूर्ण करावयाच्या. सर्व याचक एका ओळीत उभे राहून आपली पाळी आली की आपल्याला हवे ते मागून घेत होते. कोणी धन, कोणी संतान, कोणी स्वास्थ्य तर कोणी वैभव मागत होते. विष्णू दोन्ही हातांनी भरभरून देत होते. लक्ष्मीने पाहिले की, हळूहळू विष्णूचे भांडार रिकामे होत चालले आहे. तेव्हा विष्णूचा हात धरत ती म्हणाली, अशा रीतीने देत राहिलात तर वैकुंठाचे सर्व वैभव काही क्षणातच नाहीसे होईल. मग आपण काय करायचे? सस्मित चेहर्याने विष्णूंनी उत्तर दिले, ‘तू अजिबात चिंता करू नकोस. मजजवळ अजून एक संपत्ती सुरक्षित आहे. ती मानव, गंधर्व, किन्नर या पैकी कोणीच अजून मागितलेली नाही. ती संपत्ती जोपर्यंत आपल्याजवळ आहे तोपर्यंत तू दुसरे काहीही द्यावे लागले तरी काळजी करू नकोस.’लक्ष्मीने विचारले, ‘सांगा बघू अशी कोणती अजब गोष्ट आपल्याजवळ आहे. माझ्या तर काही लक्षात येत नाही.’ विष्णू म्हणाले, ‘तिचं नाव आहे शांती’ जर मनःशांती नसेल तर विश्वातील सारी संपत्ती जरी माणसाला प्राप्त झाली तरी ती आपत्तीच ठरते. म्हणून मी शांती सांभाळून ठेवली आहे._
*श्री . देशमुख एस .बी.*
*मुख्याध्यापक :- पाताळेश्वर विद्यालय पाडळी, ता. सिन्नर*
*सचिव:- बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर,**सचिव :- प. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे.*
*सौ . सविता देशमुख उपशिक्षिका पाताळेश्वर विद्यालय पाडळी ता -सिन्नर जि- नाशिक* *7972808064*