सातारा दि : कोयना धरणाच्या जावळी-महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा येथील शिवसागर जलाशयात पोहताना बुडालेल्या रेठरे वाठार ता. कराड येथील संकेत संग्राम काळे वय २७ वर्षे या युवकाचा मृतदेह आज सकाळी सात वाजता शिवसागर जलाशयाच्या किनारी नदी पात्रात तरंगुन आला. याबाबत माहिती अशी की, पर्यटनासाठी असंख्य लोक तापोळा-बामणोली या ठिकाणी येतात. कोयना धरणाच्या पाणी फुगवटा जलशयाने नैसर्गिकरित्या वरदान लाभलेले आहे. जलद नौका व नियमित नौका विहीर करण्यासाठी अनेक पर्यटक येतात, याठिकाणी सुमारे दोनशे नौका यंत्रणा कार्यान्वित आहे.तसेच पर्यटनाला पूरक स्थानिक बांधव व्यवसाय करीत आहेत.त्यांच्या सहकार्याने नेहमी लाभते.गेली तीन दिवस मदत कार्यासाठी स्थानिक लोक झटत आहेत.
गेल्या तीन दिवसापासून एका पर्यटकाचा जलद नौका पलटी होऊन बुडून मृत्यू झाला. त्यानंतर महाबळेश्वर ट्रॅकर चे जवान व मेढा पोलीस व स्थानिक ग्रामस्थ या मृतदेहाचा शोध घेत होते.पण, थंडी व जलाशयाच्या हेलकविण्याने नेमके काय करायचे?याचा अंदाज येत नव्हता. अखेर तीन दिवसानंतर संकेत काळे यांचा मृत्यूदेह पाण्यावर तरंगला.मृत्यूदेह पाण्याबाहेर काढून मेढा पोलीस ठाण्याच्या वतीने पंचनामा सुरू करण्यात आला आहे.सदर तरुण कसा बुडाला?लाईफ जॅकेट घातले होते का? सदरच्या जलद नौकाची जिल्हा प्रशासनाने तपासणी केली होती का? असे अनेक प्रश्न यानिमित्त उपस्थित केले जात आहेत.
सुरुवातीला असा प्रकार घडला नाही, असे काही जण सांगत होते. परंतु, संकेत काळे सोबत असलेल्या पर्यटकांनी या घटनेला दुजोरा दिला होता. मदत कार्य गतीने सुरू झाले असले तरी यामुळे काही काळासाठी जलद नौका विहिर बंद करण्यात आले होते
हौशी पर्यटकांनी खात्री करून व नियमांचे पालन केले पाहिजे तरच पर्यटनाचा आनंद दुगाणित होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या भागातील असून त्यांच्या बद्दल सर्वांनाच अभिमान आहे. सदरची घटना दुर्दैवी असून मृत्यू तरुणाच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.बोट क्लब च्या माध्यमातून स्थानिक भूमिपुत्र व पर्यटकांना विमा संरक्षण मिळणे आवश्यक आहे. तरच येथील पर्यटकांना सुरक्षितता वाटेल अशी प्रतिक्रिया नवी मुंबई येथील पर्यटक सचिन जगताप व श्याम रोकडे यांनी दिली आहे.