मनसेचं ‘पाकिस्तान जिंदाबाद’विरोधात ‘हर हर महादेव’ आंदोलन

0

पुणे : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या नेत्यांची देशात धरपकड सुरु झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी त्याचा निषेध व्यक्त केला होता.
यादरम्यान, PFIच्या समर्थकांनी आज पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. यासंदर्भात राज्यात विविध प्रतिक्रिया उमटत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात आंदोलन केलं. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’चा विरोध करत ‘हर हर महादेव’ची जोरदार घोषणाबाजी केली.
पुण्याच्या अलका चौकात आज (25 सप्टेंबर) दुपारी एकच्या सुमारास मनसे कार्यकर्ते जमा झाले. त्यांनी पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणाबाजीचा निषेध केला.

दरम्यान, अनुचित प्रकार टाळण्यासाठी यावेळी पोलिसांचा बंदोबस्त अलका चौक परिसरात तैनात करण्यात आला होता.

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील संस्था, भाजप आणि शहरातील सामाजिक संस्थांनीही रविवारी (25 सप्टेंबर) दुपारी 2.30 वाजता पोलिस आयुक्त कार्यालयाला भेट दिली. पाकिस्तान जिंदाबाद घोषणा देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी ही भेट होती.

या भेटीनंतर बोलताना पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी म्हटलं की, “23 सप्टेंबर 2022 रोजी बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत जी घटना घडली. त्या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दंगल, रस्ता अडवणे अशा कलमांअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर जे व्हीडिओ व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर जे व्हीडिओ व्हायरल होत आहेत, त्या अनुषंगानेही गुन्ह्याचा तपास आधीच सुरू करण्यात आला आहे.

तपासात ज्या गोष्टी निष्पन्न होतील, त्यानुसार इतर संबंधित कलमही लावण्यात येतील. व्हायरल होणारे सर्व व्हीडिओ एकत्र करून त्याचा सखोल तपास करण्यासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात येणार आहेत. या घटनेसंदर्भात पोलिसांची कठोर भूमिका आहे.”

भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक याबाबत म्हणाले, “पोलिसांनी या प्रकरणात केलेली कारवाई ही सौम्य स्वरुपाची आहे. 41 जणांना त्यांनी अटक केली आणि त्यांची जामिनावर मुक्तता झाली आहे. त्यांच्यावर लावण्यात आलेली सौम्य कलमे आम्हाला मान्य नाहीत. ज्यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या, त्यांना आपण माफ करू शकत नाही. ते राष्ट्रद्रोही आहेत, त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे.

किड समूळ नष्ट करा- राज ठाकरे

पाकिस्तान झिंदाबाद घोषणेच्या प्रकारावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही ट्वीट करून प्रतिक्रिया दिली.

ते म्हणतात, “NIA ने छापे घातले आणि PFI च्या अधिकाऱ्यांना अटक केली म्हणून पुण्यात या संघटनेच्या अधिकाऱ्यांनी अल्लाहू अकबर, पाकिस्तान जिंदाबाद शा घोषणा दिल्या. सरकारने त्यांना वेळीट ठेचलं पाहिजे.

ही अटक कशासाठी झाली? तर दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणं, त्यांचं प्रशिक्षण भरवणं या गंभीर आरोपांखाली. थोडक्यात देशद्रोही कृत्यांसाठी. तरीही या देशद्रोह्यांचं समर्थन करत जर या PFI च्या कार्यकर्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल तर तुमचा धर्म आणि पाकिस्तानात चालते व्हा. ही थेरं आमच्या देशात चालणार नाहीत.
माझी केंद्रातील आणि राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की फक्त या देशद्रोह्यांना नव्हे तर त्यांच्या समर्थकांना पण अशी अद्दल घडवा की यापुढे पाण्यासाठी देखील पा उच्चारता येणार नाही.

नाहीतर आता या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. हिंदुस्थानातील हिंदूच्या आणि महाराष्ट्रातील हिंदू मरहट्ट्यांच्या मुठी आवळल्या तर यांना कुठे पाय लावून पळायला लागेल हे मला सांगायला लावू नका. या सगळ्याने उगाचच सणासुदीच्या काळात अशांतता पसरेल.

माझी केंद्रातील, राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा हिंदुस्थानात दिल्या जाणार असतील तर… आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित आहे.
त्यापेक्षा ही कीड समूळ नष्ट करा, यातच हिंदुस्थानाचं हित आहे.”

मुख्यमंत्र्यांकडून घोषणांचा निषेध
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीटरवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिवरायांच्या भूमीत असले प्रकार आजिबात सहन केले जाणार नाहीत असं ते म्हणाले आहेत.

पुण्यात ज्या समाजकंटकांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले त्या प्रवृत्तीचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. पोलीस यंत्रणा त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करेलच, पण शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत, असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

तर देवेंद्र फडणवीस यांनी या घोषणा देणाऱ्यांवर माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही, कारवाई करू”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here