❂ दिनांक:~ 27 सप्टेंबर 2022 ❂*
* वार ~ मंगळवार *
* आजचे पंचाग *
━═•●◆❃★❂★❃◆●•═━
*आश्विन. 27 सप्टेंबर*
*तिथी : शु. द्वितीया (मंगळ)*
*नक्षत्र : चित्रा,*
*योग :- ब्रम्हा*
*करण : बालव*
*सूर्योदय : 06:22, सूर्यास्त : 06:37,*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
* सुविचार *
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*वेळेची किंमत पैश्यापेक्षा जास्त आहे. आपण अधिक पैसे कमवू शकतो मात्र आपल्याला अधिक वेळ मिळत नाही….*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*म्हणी व अर्थ *
*उडत्या पक्ष्याची पिसे मोजणे.*
*अर्थ:- अगदी सहज चालता चालता एखाद्या गोष्टीची परीक्षा करणे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
* दिनविशेष *
*या वर्षातील 270 वा दिवस आहे.*
* महत्त्वाच्या घटना *
*१८२५: द स्टॉक्टन अँड डार्लिंग्टन रेल्वेने जगातील सर्वप्रथम प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू केली.*
*१८५४: एस. एस. आर्क्टिक बोट अटलांटिक महासागरात बुडून ३०० लोक ठार झाले.*
*१९०५: आइन्स्टाइनने E=mc² हे समीकरण पहिल्यांदा मांडले.*
*१९२५: डॉ. केशव हेडगेवार द्वारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरएसएसची स्थापना.*
*१९४०: दुसरे महायुद्ध – बर्लिन येथे जर्मनी, जपान व ईटली या देशांत त्रिपक्षीय तह झाला.*
*१९५८: मिहीर सेन हा इंग्लिश खाडी पार करणारा पहिला आशियाई जलतरणपटू बनला.*
*१९६१: सिएरा लिओनचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश*
*१९८०: जागतिक पर्यटन दिन*
*१९९६: तालिबानने अफगाणिस्तानातील काबूल शहर जिंकले. राष्ट्राध्यक्ष बुर्हानुद्दीन रब्बानी यांनी पलायन केले तर मोहम्मद नजीबुल्लाह यांना भर चौकात फाशी देण्यात आले.*
*जन्मदिवस / जयंती*
*१९०७: भारतीय क्रांतिकारी भगत सिंग यांचा जन्म.*
*१९०७: वामनराव देशपांडे – संगीत समीक्षक (मृत्यू: ? ? १९९०)*
*१९३२: यश चोप्रा – चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते (मृत्यू: २१ आक्टोबर २०१२)*
*१९३३: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यश चोप्रा यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑक्टोबर २०१२)*
*१९५३: माता अमृतानंदमयी*
*१९७४: भारतीय क्रिकेट खेळाडू पंकज धर्माणी यांचा जन्म.*
*१९८१: लक्ष्मीपती बालाजी – भारतीय क्रिकेटपटू*
*मृत्यू / पुण्यतिथी*
*१७२९: मराठेशाहीच्या आपत्प्रसंगी पराक्रम गाजवणारे खंडेराव दाभाडे यांचे निधन. दाभाडे घराण्याला सातशे गावांची देशमुखी असल्यामुळे त्यांना वतनदारांचे मुकुटमणी म्हणत.*
*१८३३: राजा राम मोहन रॉय – समाजसुधारक, धर्मसुधारक व ब्राम्हो समाजाचे संस्थापक, कन्याविक्रय, कन्याहत्या, बालविवाह इ. चालींमधून स्त्रीला मुक्त करण्यासाठी त्यांनी आंदोलन उभारले. (जन्म: २२ मे १७७२)*
*१९२९: शिवराम महादेव परांजपे – ’काळ’ कर्ते, विद्वान, वक्ते, लेखक, स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार (जन्म: २७ जून १८६४)*
*१९७२: एस. आर. रंगनाथन – भारतीय गणितज्ञ व ग्रंथालयशास्त्रतज्ञ (जन्म: १२ ऑगस्ट १८९२)*
*१९७५: तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री – रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ३ फेब्रुवारी १९००)*
*१९९२: अनुताई वाघ – समाजसेविका (जन्म: १७ मार्च १९१०)*
*१९९९: डॉ. मेबल आरोळे – रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बहुद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका (जन्म: २६ डिसेंबर १९३५)*
*२००४: शोभा गुर्टू – शास्त्रीय गायिका (जन्म: ८ फेब्रुवारी १९२५)*
*२००८: महेन्द्र कपूर – पार्श्वगायक (जन्म: ९ जानेवारी १९३४ – अमृतसर)*
*२०१२: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक संजय सूरकर यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १९५९)*
*२०१५: भारतीय लेखक आणि राजकारणी सय्यद अहमद यांचे निधन. (जन्म: ६ मार्च १९४५)*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*सामान्य ज्ञान *
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी संस्था कोठे आहे ?*
*पुणे*
*महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसुबाई याची उंची किती मीटर आहे ?*
*१६४६*
*सुती कापड उदयोगासाठी कोणते हवामान पुरक असते ?
*दमट*
*गंगापूर धरण कोणत्या नदीवर आहे ?*
*गोदावरी*
*ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?*
*चंद्रपूर*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
* बोधकथा *
*विद्वत्तेने अहंकारी बनू नका*
कालिदासांना ही जाणीव झाली होती कि ते खूप मोठे ज्ञानी झालेत. एकदा प्रवासात त्यांना तहान लागली, त्यांनी पाहिलं कि जवळच एक वृद्ध स्त्री विहिरीवरच पाणी भरत आहे. कालिदास म्हणाले, माते मला पाणी देशील तर तुला खूप पुण्य मिळेल. वृद्ध स्त्री म्हणाली बाळा मी तुला ओळखलं नाही, कृपया तू तुझा परिचय दे, मग मी तुला पाणी देते. मग कालिदासाने परिचय देण्यास सुरवात केली. कालिदास म्हणाले मी प्रवासी आहे. वृद्ध स्त्री म्हणाली प्रवासी तर फक्त दोनच आहेत एक चंद्र आणि दुसरा सूर्य जे दिवस रात्र चालतच असतात. कालिदास म्हणाले मी अतिथी आहे. पाणी मिळेल ? वृद्ध स्त्री म्हणाली अरे अतिथी तर फक्त दोनच आहेत एक धन आणि दुसर तारुण्य ते निघून जातात. खरं सांग तू कोण आहेस ? कालिदास म्हणाले मी सहनशील आहे. आता तरी पाणी मिळेल ? वृद्ध स्त्री म्हणाली अरे सहनशील तर तर फक्त दोनच आहेत एक धरती आणि दुसर झाडं. धरती जी पुण्यवाण लोकांच्या बरोबर पापी लोकांच देखील ओझं घेऊन आहे. आणि झाडं ज्यांना दगडं मारला तरी ती मधुर फळच देतात. कालिदास आता हतबल झाले,कालिदास म्हणाले मी हट्टी आहे. वृद्ध स्त्री म्हणाली नाही तू हट्टी कसा असशील, हट्टी तर फक्त दोनच आहेत एक नखं आणि दुसरे केस, कितीही कापले तरी परत वाढतातच. कालिदास आता कंटाळले आणि कालिदास म्हणाले मी मूर्ख आहे. वृद्ध स्त्री म्हणाली मूर्ख तर फक्त दोनच आहेत एक राजा ज्याची योग्यता नसताना तो सर्वांच्यावर राज्य करतो आणि दुसरा दरबारातील पंडित जो त्या राजाला रिझवण्यासाठी चुकीच्या गोष्टीला खरं सिद्ध करण्याची चेष्टा करतो. कालिदास आता काही ही बोलण्याच्या मनःस्तिथीतीत नव्हते, ते त्या स्त्रीच्या पायावर डोकं ठेऊन पाण्यासाठी विनवनी करू लागले. वृद्ध स्त्री म्हणाली उठ बाळा, आवाज एकूण कालिदासांनी वर पाहिलं तर त्या स्त्रीच्या जागी साक्षात सरस्वती देवी उभी होती, कालिदास आता नतमस्तक झाले. सरस्वती देवी कालिदासांना म्हणाली, शिक्षणाने ज्ञान येते, अहंकार नाही. शिक्षणाच्या बळावर मिळालेला मान, स्नमान आणि प्रतिष्ठा यालाच तू सर्वस्व समजलास आणि त्याचा तुला अहंकार आला. तुझे डोळे उघडणे आवश्यक होते. कालिदासांना त्यांची चूक समजली, ते भरपूर पाणी पिऊन पुढील प्रवासाला निघाले.
*तात्पर्य :-*
*विद्वत्तेवर कधीच गर्व करू नका, अहंकारी बनू नका, अन्यथा हाच गर्व आणि अहंकार तुमची विद्वत्ता नष्ट करू शकतो.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*श्री. देशमुख. एस. बी*
*सचिव*
*नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ*
*कार्यवाह – नाशिक जिल्हा T.D.F.*
सौ. सविता एस देशमुख*
*उपशिक्षिका पाताळेश्वर माध्य. विद्यालय पाडळी, ता -सिन्नर जिल्हा- नाशिक.*
7972808064