पैठण,दिं.२६. : जायकवाडी धरणाच्या १८ वर्क्र दरवाजातून गोदावरी नदीच्या पात्रात १४ हजार १२४ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या धरणात ९९.२३ टक्के पाणीसाठा असून सध्या ओझरवेल, भंडारदरा,देवगड बंधारा नागमठाण ,सेधुरवधा या ठिकाणाहून १४ हजार १२४ पाण्याचा विसर्ग येत असून तो तसाच धरणाच्या १८ वक्र दरवाजातून गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे जायकवाडी पाटबंधारे विभागाने पाण्याचे योग्य नियोजन केल्याने पुरस्थिती उदभवली नसल्याने नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे.
१ जून पासून आज पर्यंत २०० टीएमसी पाण्याची आवक प्राप्त झाली असून धरणा मध्ये पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचने प्रमाणे निर्धारित पाणी पातळी कायम ठेवून १४५ टीएमसी पाणी गोदावरी नदीच्या पात्रात विसर्ग करण्यात आले धरणाच्या आज पर्यंतच्या ईतिहासा मध्ये सर्वात मोठ्या पुरनियंत्रणाचे काम उत्तम प्रकारे पार पाडत आहे यापुढील काळामध्ये वारंवार धरणाचे दरवाजे संचलन करून पाणी विसर्जनाचे नियमन करावे लागणार आहे यासाठी जायकवाडी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, उपविभागागीय अभियंता अशोक चव्हाण,धरण अभियंता विजय काकडे, बंडू अंधारे, गणेश खराडकर,अब्दुल बारी गाजी, अप्पासाहेब तुजारे, अप्पासाहेब गरूड, रामनाथ तांबे , शेषराव आडसुळ हे पुरपरीस्थिवर नियंत्रण ठेवून आहे.
——–
छायाचित्र : विनायक मोकासे, पैठण