उरण दि ३(विठ्ठल ममताबादे ) रायगड जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेली व विद्यार्थ्यांच्या ज्ञानरचनावादास सतत प्रोत्साहन देणारी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारडे येथील उपक्रमशील शिक्षक कौशिक ठाकूर सतत चार वर्ष राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत रायगड जिल्ह्यात सर्वोत्तम पाच मध्ये येण्याचा मान मिळवला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत कौशिक ठाकूर यांनी सन २०१९ मध्ये शैक्षणिक संग्रहालय या नवोपक्रमास तृतीय क्रमांक,सन २०२० मध्ये तळ्याच्या फांजीवर या नवोपक्रमास तृतीय क्रमांक,सन २०२१ मध्ये माझे अंगण माझी शाळा या नवोपक्रमास द्वितीय क्रमांक तर सन २०२२ यावर्षी कबाड से घबाड या नवोपक्रमास द्वितीय मिळवून उरण तालुक्याचे नाव उज्जवल केले आहे.
सदर यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य महाजन सर, अधिव्याख्याते संतोष दौड सर, राठोड मॅडम ,लीठ्ठे सर,टोणे सर,तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी प्रियंका पाटील यांनी अभिनंदन केले