महावितरण कर्मचाऱ्यांचा संप; बत्ती गुल, पाणी पुरवठा बंद; नागरीकांबरोबर जनावरांचे हाल

0

देवळाली प्रवरा /राजेंद्र उंडे 

              महावितरणचे कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाला असून, त्यामुळे राहुरी तालुक्यातील वीज सकाळ पासुन  गुल झाली. महावितरण कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिल्यानंतर राहुरी तालुक्यातील सकाळी 10 वाजलेपासून बत्ती गुल झाली आहे.सायंकाळी  नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. अंधारात नागरिकांना चाचपडत रस्ते शोधण्याची वेळ आली. महावितरण कंपनीने आपत्कालीन व्यवस्था केली असली तरी ती अद्याप कार्यान्वित झाली नसल्याने समोर आले आहे.यंञणा कार्यान्वित होण्यास वेळ लागणार असल्याचे समोर येत आहे. दरम्यान, बुधवारी सायंकाळ पर्यंत तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता.

               राज्यभरातील सरकारी वीज क्षेत्रातील कर्मचारी मंगळवार मध्यरात्रीपासून ७२ तासांच्या संपावर गेले आहेत. याचा मोठा परिणाम राज्यात पाहायला मिळत आहे.राहुरी तालुक्यात वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पोलीस खातेही टेन्शनमध्ये आले आहे. राहुरी तालुक्यातील राञीच्या अंधाराचा फायदा घेऊन चोऱ्या, घरफोडयांमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने पोलीस खातेही टेन्शनमध्ये आले आहे. अनेकांना या संपाची कल्पनाही नसल्याने जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही. रब्बीच्या नवीन लागवड झालेल्या पिकांना पाणी देता येत नसल्याने अनेक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पिठाच्या गिरणी बंद झाल्याने शेजाऱ्यांकडे पीठ मागण्याची वेळ महिलांवर आली आहे.

          अनेकांचे मोबाईल चार्ज होऊ न शकल्याने त्यांचा संपर्क तुटला आहे. आजारी व्यक्तींनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. कुणाला फोन करायचा असा प्रश्न लोकांना पडला आहे. अशी परिस्थिती राहिली तर तीन दिवसात मोठा असंतोष निर्माण होऊ शकतो. पहिल्याच दिवशी नागरिक संतप्त झाल्याचे चित्र आहे.

           देवळाली प्रवरा व राहुरी नगर पालिका भागातील विज पुरवठा खंडीत झाल्याने नगर पालिकेच्या पाणी पुरवठ्यावर त्याचा परीणाम झाला असुन अनेक भागात पाणी पुरवठा होवू शकला नाही. नागरीकांबरोबर जनावरांच्या पाण्याचे हाल झाले आहेत.अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाच्या ठिकाणी विज पुरवठा खंडीत असल्याने अडचणी निर्माण झाल्या.आंबी,दवणगाव, राहुरी फँक्टरी, टाकळीमियाँ आदी भागातील विज उपकेंद्र बंद पडले होते.

चौकट

पाण्याचा वापर जपुन करणे;निकत

मुळा धरणावर विज पुरवठा सुरळीत चालू असला तरी जलशुद्धीकरण केंद्रावर विज पुरवठा खंडीत असल्याने अनियमित पाणी पुरवठा करण्यात आला. काही भागात पाणी पुरवठा होवू शकला नाही.नागरीकांनी विज पुरवठा सुरळीत चालू होई पर्यंत उपलब्ध पाणी जपुन वापरावा असे आवाहन मुख्याधिकारी अजित निकत यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here