संगमनेर : जागेच्या वादातून दोन गटात वाद झाल्याने बदामाचे झाड तोडून सलून दुकान व शौचालयाची तोडफोड करण्यात आली. यामुळे दोन गटात शाब्दिक चकमक उडाली. हि घटना मंगळवारी दुपारी १२.३० वाजता तालुक्यातील खांडगाव येथे घडली. याप्रकरणी परस्पर फिर्यादीवरून शहर पोलिसांनी २६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
राजेंद्र यादव सस्कर हे घरी नसताना जनार्दन गोविंद गुंजाळ, संदीप चंद्रभान गुंजाळ, दत्तू तुकाराम गुंजाळ, विलास तुकाराम गुंजाळ, भानुदास देवराम गुंजाळ, बादशहा गोविंद गुंजाळ, बाबासाहेब गोविंद गुंजाळ, सचिन बादशहा गुंजाळ, अमोल भानुदास गुंजाळ, संकेत बाबासाहेब गुंजाळ, शुभम बाबासाहेब गुंजाळ, नितीन सूर्यभान गुंजाळ, अजित बाबासाहेब गुंजाळ, महेश नामदेव गुंजाळ, अमित बाबासाहेब गुंजाळ व अन्य पाच महिलांनी त्यांच्या सलून दुकानाचे नुकसान करून बदामाचे झाड तोडले तसेच शौचालयाच्या नळ जोडणीची तोडफोड करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी राजेंद्र सस्कर यांच्या फिर्यादीवरुन वरील १९ जणांवर तर जर्नादन गुंजाळ घराजवळ साफसफाई करत असताना राजेंद्र यादव सस्कर, संजय यादव सस्कर, सुभाष यादव सस्कर, प्रसाद संजय सस्कर, पुष्पा कमळाकर सस्कर, सुषमा राजेंद्र सस्कर, सुधाकर यादव सस्कर यांचा मुलगा (नाव माहीत नाही) आदींनी ज्योती संजय गुंजाळ व घरातील अन्य सदस्यांना ही जागा आमची आहे, म्हणत शिवीगाळ व दम दिला. जनार्दन गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून ७ अशा एकूण २६ जणांवर विविध कलमान्वये शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.