क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त स्वरसंगीत कार्यक्रम संपन्न

0

 सातारा दि. 4 :   क्रांतीज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्या 192वी जयंतीनिमित्त फलटण येथील उपळेकर महाराज समाधी मंदिर येथे स्वरसंगीत कार्यक्रम संपन्न झाला. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

            या कार्यक्रमात देशभक्तीपर तसेच क्रातिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन वादर करण्यात आले. वादक व गायक किरण शिंदे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकार झाला. यावेळी अरुण शिंदे, अपर्णा बिवालकर, विवेश शिंदे, योगेश साळुंके, संतोषा साळुंके, श्रध्दा शिंदे, सागर जाधव झुंबर जाधव, सुजाता शिंदे , हरिदास साळुंखे, ओंकार साळुंखे, अक्षय साळुंखे, सुनील नारायण प्रजापति,श्रावणी जितेंद्र पवार नृत्य,रिया कैलास पवार, या कलाकारांनी आपली कला सादर केली.

            कार्यक्रमास माजी नगरसेविका  सुभद्राराजे नाईक निंबाळकर, वारकरी संप्रदायाचे विणेकरी अनिरुद्ध रानडे, लक्ष्मण साळुंखे , सौ विश्रांती वनारे, अनिल वनारे, सपना पवार, अनिल पवार, शोभा मोरे, महेंद्र मोरे यांच्यासह असंख्य रसिक व श्रोतेगण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here