ऊस तोडणीसाठी काळानुरूप बदल स्विकारावे लागतील – आ. आशुतोष काळे

0

गोदावरी खोरे व गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनीची वार्षिक सभा संपन्न   

कोळपेवाडी वार्ताहर- मागील दोन ते तीन वर्षापासून समाधानकारक पर्जन्यमान होत असल्यामुळे कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यक्षेत्रात ऊस लागवडी मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे ऊस आणण्यासाठी कार्यक्षेत्राबाहेर जावे लागणार नसले तरी ऊस तोडणी मजुरांची जाणवत असलेली टंचाई लक्षात घेता भविष्यात ऊस तोडणीसाठी काळानुरूप बदल स्विकारावे लागतील असे प्रतिपादन गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी व गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.

गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रा. लि; गौतमनगर ची ५१ वी व गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रा. लिमिटेडची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कंपनीचे मार्गदर्शक संस्थेचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर शंकररावजी काळे व सौ. सुशीलामाई काळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेस प्रारंभ झाला. अध्यक्ष पदाची सूचना अशोकराव आहेर यांनी मांडली. सदर सूचनेस बिपिनराव गवळी यांनी अनुमोदन दिले. संचालक ज्ञानेश्वर हाळनोर यांनी २०२०-२१ या आर्थिक वर्षात निधन झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली.

यावेळी पुढे बोलतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या गळीत हंगामाची पूर्व तयारी सुरु असून ऊस तोडणीसाठी वाहतूक कंत्राटदार यांना आगाऊ आर्थिक पुरवठा केला आहे. मात्र मागील काही वर्षापासून जाणवत असलेले ऊस तोडणी मजुरांचे संकट यावर्षी देखील जाणवणार आहे. मागील गळीत हंगामात फेब्रुवारी महिन्यात उष्णतेमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे ऊस तोडणी मजुरांची कार्यक्षमता कमी होवून त्यांचा परिणाम ऊस तोडणीवर झाला होता. तरीदेखील नोंदविलेल्या सर्व ऊसाचे वेळेत गाळप केले. परंतु भविष्यातील ऊस उपलब्धता पाहता यांत्रिकीकरणाची मदत घ्यावी लागेल. त्यामुळे ट्रक्स धारकांनी एकत्र येवून केन हार्वेस्टर खरेदी करावेत व शेतकी विभाग व तोडणी मुकादम यांच्या भरवशावर न राहता स्वत:च्या टोळ्या ऊस तोडणीसाठी तयार कराव्या असे आवाहन केले. २०२१-२२ च्या गळीत हंगामातील सर्व सभासद ट्रक्स धारकांचे कंपनीने सर्व प्रकारची देणी  अदा केली असून भविष्यात ऊस वाहतूकी संदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वोतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.

 सभेचे प्रास्तविक गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दिलीपराव शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व अहवाल वाचन जनरल मॅनेजर संतोष पवार यांनी केले तर आभार संचालक विजयराव जाधव यांनी मानले. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे, संचालक सुधाकरराव रोहोम, राजेंद्र घुमरे, सचिन चांदगुडे, वसंतराव आभाळे, शंकरराव चव्हाण, राहुल रोहमारे, शिवाजीराव घुले, सुनील मांजरे, श्रीराम राजेभोसले, डॉ. मच्छिन्द्र बर्डे, मनोज जगझाप, अशोक मवाळ, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, अॅड. एस.डी. औताडे, अॅड. विद्यासागर शिंदे, अॅड. डी. जी. देवकर, देवकर, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्टचे कार्यकारी संचालक दिलीपराव शिंदे, गौतम केन ट्रान्सपोर्टचे कार्यकारी संचालक भिकाजी सोनवणे, विजयराव जाधव, कैलास आहेर, विक्रम मांढरे, सुभाष गवळी, वाल्मिकराव कोळपे, मारुतीराव विघ्ने, रंगनाथ घोटेकर, ज्ञानेश्वर हाळनोर, कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, सेक्रेटरी बी.बी. सय्यद, शेतकी अधिकारी कैलास कापसे, आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळ – गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रा. लि; गौतमनगर व गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रा. लिमिटेडच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलतांना आ. आशुतोष काळे समवेत मान्यवर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here