ग्रंथ महोत्सवात कराओंके ग्रुपला स्थान मिळाले !

0

सातारा : गाण्यासाठी प्रसिद्ध असणारा कराओंके ग्रुपला सातारा पॅटर्न म्हणुन ओळखणाऱ्या ग्रंथ महोत्सवात स्थान मिळाले आहे.अशी घोषणा ग्रंथमहोत्सव’चे कार्यवाह शिरीष चिटणीस यांनी केली आहे.

             येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व कराओंके सिंगर्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या,”शाम-ए -गझल” या कार्यक्रमात शिरीष चिटणीस यांनी वरील घोषणा केली.प्रारंभी, मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

                  नरेंद्र पाटील म्हणाले,  “समाजातील प्रत्येकाच्या कलागुणांना वाव देणारे घटक म्हणून शिरीष चिटणीस यांच्याकडे पाहिले जाते. ते कलाकारांना नेहमीच प्रोत्साहन  देत असतात.गाणे जितके नैसर्गिक तेवढेच रडणे सुद्धा नैसर्गिक आहे.गाणी गाताना गाण्यांची भीती घालवणे, स्टेज डेअरिंग, गाणे सादर करण्याची पद्धत, गाण्यातील बारकावे ही सर्व तयारी विजय साबळे  गायक कलाकारांकडून करून घेतली असून  कलाकार जागा करण्याचे काम नक्कीच केले आहे.पुणे विद्येचे व संस्कृतीचे माहेरघर आहे तिथे काहीही करता येऊ शकते.  परंतु सातारचे तसे नाही. सातारमध्ये संगीताची चळवळ सुरू होऊ पाहते. परंतु कोणतीही गोष्ट सुरू करताना  राजश्रय  लागतो.चिटणीससाहेबांनी ती गरज पूर्ण केली आहे.गीत गाताना कलाकारांचे श्रम, त्याचप्रमाणे  विजय साबळे यांचे कलाकारांकडून उत्तम गीत सादरीकरण सराव करून घेण्याचे श्रम व त्यास चिटणीस साहेबांचे प्रोत्साहन संगीतासाठी पोषक आहे. सातारा सारख्या  ठिकाणी ही संगीताची चळवळ बाळस धरू पाहत असून चळवळीला चांगले स्वरूप प्राप्त होत आहे. सातारा  पॅटर्न म्हणून ओळखला जाणारा  यंदाच्या ग्रंथ महोत्सवामध्ये कराओंके ग्रुपला  गाण्याची संधी  मिळाली आहे. ही कलाकारांच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. ग्रंथ महोत्सव मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून  साहित्यिक व संगीतातील अनेक मान्यवर व्यक्ती तसेच थोर  विचारवंत येत असून  त्यांच्यासमोर  या गायकांना  आपापले गीत सादर करण्याची संधी मिळाली असून  त्या व्यासपीठाचा उपयोग करून घ्यावा.”

                  अनिल  वीर म्हणाले,”शामे- ए- गजल यासारखे प्रोग्राम संस्था आयोजित करत असून त्यातून समस्त सातारकर रसिक श्रोत्यांना  गीताची एक पर्वणी दिली जात आहे. कराओंके संगीतामुळे  समाजात नवीन गायक कलाकार घडला जात आहे.त्यासाठी संस्था हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होत आहे.”

           यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. सदरच्या कार्यक्रमास डॉ.शशिकांत पवार, माजी नगरसेवक सागर पावसे, सुनील राठी,राजेंद्र शेजवळ, विजय साबळे,विनायक भोसले, विकास साबळे, युनूस,शहाबुद्दीन शेख  धीरेंद्र राजपुरोहित,प्रकाश सावंत, विकास साबळे , लक्ष्मीकांत अघोर,प्रिया अघोर, सुनील भोजने,ज्योत्सना खुटाळे, विजया कदम,आर.डी. पाटील, जगदीश खंडागळे सचिन शिंदे, विनोद कामतेकर, प्रवीण सपकाळ, अनिल मसुरकर, शुभम बल्लाळ आदी मान्यवरासह गायक कलाकार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here