वीर आदर्शमाता पुरस्कार सौ.कांबळे व द्राक्षा खंडकर यांना वितरण

0
फोटो - वीर आदर्शमाता व ज्ञानज्योती पुरस्कार प्रदान करताना अनुक्रमे कु.हर्षदा राक्षे व कु.सायली गवळी शेजारी मान्यवर.

सातारा : राष्ट्रमाता जिजाऊ व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधुन तसेच किसाबाई वीर चौथ्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे चौथा वीर आदर्शमाता पुरस्कार सौ. कल्पनाताई कांबळे व ज्ञानज्योती पुरस्कार द्राक्षाताई खंडकर यांना अनुक्रमे कु.हर्षदा राक्षे व कु. सायली गवळी यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यापूर्वी, सौ.लक्ष्मी लाड,सौ. कल्पना भोसले,शिल्पा चिटणीस आदी महिलांचा गौरव करण्यात आलेला आहे.

      “जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जग उद्गारी… या न्यायाने महिलांचे महत्व महान आहे.आई पहिला गुरू असतो. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी अखेरपर्यंत म.ज्योतिबा फुले यांना साथ देऊन प्रतिकूल परिस्थितीत ज्ञानदानाची कवाडे खुली केली. राष्ट्रमाता जिजाऊंनी छ. शिवबा घडविले.छ. शिवरायांच्या विचारधारेच्या अधिपत्याखालीच  फुले-शाहु-आंबेडकर विचारधारा भक्कम असून सौहार्दपूर्ण समाज निर्माण होत आहे.त्यामुळे कोणत्याही महापुरुष यांची नावे घेतली तरी वरचे नाव छ. शिवाजी महाराज यांचेच असणार आहे.” असे विचार बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांनी स्पष्ट केले. याच अनुषंगाने मनोगत, पोवाडे व गाणी सादर करण्यात आली.

        राष्ट्रोत्सव संयोजन समितीचे उपाध्यक्ष ऍड.विलास वहागावकर यांनी मानपत्राचे वाचन केले. यावेळी धम्मबांधव उत्सव कमिटीचे अध्यक्ष शामराव बनसोडे, जिल्ह्यातील एकमेव भन्ते दिंपकरजी,शाहिर प्रकाश फरांदे यांच्यासह उपस्थित सर्व महिलांच्या हस्ते पुतळ्यास व प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शाहिर श्रीरंग रणदिवे व सौ. कल्पना कांबळे यांनी अनुक्रमे पोवाडा व गाणी यांच्या माध्यमातून प्रबोधन केले.त्यांना कोरस व उपस्थितांनी दाद दिली. सदरच्या कार्यक्रमास वंचित संघर्ष मोर्चाचे महासचिव श्रीरंग वाघमारे, ज्येष्ट नेते दादासाहेब केंगार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष तथा रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत,वंचित संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष सुधाकर काकडे, राष्ट्रोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष ऍड. हौसेराव धुमाळ,पी.टी. कांबळे, हृषीकेश गायकवाड,आकाश कांबळे,डी. के.क्षीरसागर,मोहन यादव, सौ. स्नेहल खरात,सौ.पूजा साळुंखे, दयानंद शिरसाट,शंकर वायदंडे, अजय सोनकांबळे, शिवनाथ जावळे, प्रकाश भोसले, शांताराम वाघमारे,दिलीप बनसोडे, हृषीकेश सौरटे,तुकाराम गायकवाड, यशपाल बनसोडे, वसंत सावंत, विविध संघटनांचे पदाधिकारी,उपासक व उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here