देवळाली प्रवरा / प्रतिनिधी,
कर्जाच्या खाईत लोटून बंद पडलेला डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखाना खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी अनेक अडचणींना सामोरे जात सक्षमपणे चालविला मात्र काही नाकर्त्या लोकांकडून सभासदांची दिशाभूल केली जात असून कारखाना बंद पडण्यास जबाबदार असणाऱ्या सर्वांची चौकशी करावी, आंदोलन करर्त्यांचा बोलविता धनी कोण? हे देखील समोर आले पाहिजे अशी मागणी पंचायत समितीचे सदस्य सुरेशराव बानकर व अमोल भनगडे यांच्यासह विखे समर्थक यांनी केली आहे.
डॉ.तनपुरे कारखान्याच्या विविध मुद्द्यावर कारखाना बचाव समितीने उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याबाबत तीव्र विरोध दर्शवत विखे समर्थक कार्यकर्त्यांनी व सभासदांनी तहसीलदार फसीयोद्दीन शेख व पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांना निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. बा.बा. तनपुरे सहकारी साखर कारखाना सन -२०१४ ते २०१७ या कालावधी मध्ये बंद होता . अनेक शेतकऱ्यांनी स्वर्गीय पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांचे कडे डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरु करणे बाबत लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यानुसार डॉ.सुजय विखे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली खाली निवडणुक होवुन दि. २६ जुन २०१६ रोजी नविन संचालक मंडळ अस्तीत्वात आले. या संचालक मंडळाने अहोरात्र प्रयत्न करुन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ताब्यात असलेला कारखाना ताब्यात घेतला व कारखाना सिझन २०१७/१८ पासुन सुरु करण्यात आला. हा कारखाना सन १९५६ मध्ये स्थापन झालेला आहे . मशिनरी अंत्यत जुनी झालेली आहे. तसेच कारखाना बंद असल्यामुळे मशिनरी मध्ये अनेक बिघाड झालेले होते. या अडचणीच्या काळात ही डॉ . सुजय विखे पाटील यांनी रात्र दिवस प्रयत्न करून कारखाना चालू केलेला आहे व २०१७/१८ , २०१८/१९ , २०२०/२२ व २०२१/२२ हे सिझन व्यवस्थीत रित्या पार पाडलेले आहेत . सिझन २०१९ /२० कारखान्याचे परिसरात ऊसच नव्हता, त्यामुळे बंद ठेवावा लागला होता . या सिझनमध्ये गाळप झालेला ऊसाचे सर्व पेमेंट करण्यात आलेले आहे . या कालावधीमध्ये कामगारांचे जवळ जवळ ९५ टक्के पगार अदा करण्यात आलेले आहेत. तसेच कामगारांचा ८ कोटी रुपये पी.एफ भरण्यात आलेला आहे. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ५० कोटी रुपये त्यांचे कर्जापोटी अदा करण्यात आलेले आहेत . कारखाना व्यवस्थीत घालू असतांना काही विघ्न संतोषी मंडळी सातत्याने कारखान्याचे संचालक मंडळावर गैरव्यवहाराचे आरोप करीत होते . त्यामुळे खा. डॉ.सुजय विखे पाटील यांना दि.३०/० ९ /२०२२ रोजीचे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये विरोधकांना कारखाना चालविण्याचे खुले आव्हान दिले होते परंतु कारखाना विरोधकांनी चालू केला नाही किंवा चालू करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. त्यामुळे सिझन २०२२/२३ बंद राहीलेला आहे व त्यामुळे तालुक्याची बाजारपेठ उध्वस्त झालेली आहे. तसेच कामगारांचे व शेतक-यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे. काही शेतकरी मंडळी, चक्री उपोषण करणार आहेत. या उपोषणकर्त्याकडे कारखान्याची मोठया प्रमाणात बाकी आहे . त्यांचेवर व त्यांचे पाठीराखे यांचे वर सेक्शन ८८ खाली कारवाई चालू आहे. या कारखान्याचे मोठया प्रमाणात नुकसान करून , काही नेत्यांनी त्यांचा स्वतःचा खाजगी कारखाना काढलेला आहे. त्यांनी उपस्थितीत केलेल्या मुददयाची निश्चितपणे चौकशी व्हावी यात शंका नाही.परंतु जे उपोषणास बसणार आहेत त्यांनी कारखाना चालू करण्यासाठी चक्री उपोषण करायला निघाले. परंतु हा कारखाना तेच संचालक मंडळात कार्यरत असताना कारखाना बंद केला हा खरा मुळ प्रश्न आहे . ज्यांच्याकडे कारखान्याच्या लाखो रुपयाची थकबाकी आहे तेच कारखाना चालू करण्यासाठी उपोषण करतात. त्यांनी त्यांच्याकडील थकबाकी जरी भरली तरी कारखाना चालू करण्यास मदत होणार आहे . उपोषण कर्त्याकडे असणारी थकबाकी बाबत न्यायालयाचा निर्णय देखील झाला आहे . तरी त्यांचे मालमत्तेवर कारखान्याच्या बोजा टाकावा ही आमची मागणी आहे. वरील प्रमाणे आम्ही सभासद ऊस उत्पादक शेतकरी तसेच संचालक या निवेदनाद्वारे कळवू इच्छितो की आमचे निवेदनाचा गांभीर्याने विचार करावा अन्यथा आम्हाला देखील ३० दिवसानंतर कोणत्याही क्षणी कुठली ही नोटीस न देता उपोषण केले जाईल यांची प्रशासनाने नोंद घ्यावी असे म्हटले आहे.
यावेळी चेअरमन नामदेव ढोकणे, तानाजीराव धसाळ, सुरेशराव बानकर, अमोल भनगडे उत्तमराव मुसमाडे, महेंद्र तांबे, आशिष बिडगर, शिवाजी गाडे, धनराज जगताप, मच्छिंद्र गावडे, सुरसिंग पवार, दादा पाटील सोनवणे, नयन शिंगी, गोरक्षनाथ तारडे, उत्तमराव आढाव, आबासाहेब येवले, मधुकर पोपळघट, ज्ञानदेव निमसे, बाळासाहेब जाधव, अर्जुन बाचकर, नंदकुमार डोळस, अंकुश बर्डे, पंकज चौधरी, शामराव निमसे, उत्तमराव खुळे, चंद्रभान आढाव, दिलीप गाडे, बाबासाहेब शिंदे, अर्जुन लटके, ज्ञानेश्वर भिंगारदे, दत्तात्रय ढुस, मच्छिंद्र तांबे, युवराज गाडे, विलास गोपाळे, सुभाष गायकवाड, प्रभाकर हरिश्चंद्र, अक्षय तनपुरे, उमेश शेळके, कारभारी डौले, अनिल आढाव, रवींद्र म्हसे, चंद्रकांत म्हसे, बापूसाहेब धसाळ, प्रमोद झुगे, गोविंद म्हसे, दत्तात्रय काळे, केशव म्हसे, खा.डॉ. सुजय विखे यांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर विखे, मनोज गव्हाणे आदींसह सभासद उपस्थित होते.