सातारा/अनिल वीर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या लोककलावंत सांस्कृतिक सेलची सातारा जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.ती पुढीलप्रमाणे आहे.
जिल्हाध्यक्ष-शाहिर महावीर शिंदे, उपाध्यक्ष – शाहिर तुकाराम कांबळे,सचिव-आदेश अनिल भोसले,खजिनदार-अरुण विठ्ठल गुळीक,सदस्य म्हणून शाहिर विठ्ठल गणपत खंडझोडे,शाहीर भानुदास गायकवाड,लक्ष्मण सखाराम सोनवणे,तानाजी उत्तम दोरके,अनिल धोंडिबा कोल्हटकर व संतोष एकनाथ भालेराव यांच्याही निवडी जाहीर करण्यात आलेल्या आहेत.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा लोककलावंत सांस्कृतिक सेल अनेक वर्षा पासून सर्व समाज घटकातील कलावंतांच्या उत्थानाचे कार्य करीत आहे. समाजातील अनिष्ट प्रथा, चालीरीती नष्ट करण्यासाठी मनोरंजनातून प्रबोधन करणाऱ्या लोककलावंतांना नेहमीच प्रोत्साहन दिले जाते. योग्य कलागुण अवगत असून सुद्धा प्रसिद्धीपासून वंचित असलेल्या कलावंतांना सेलतर्फे विचार मंच उपलब्ध करून दिला जातो.या निवडीबद्धल जिल्ह्यात कलावंतांनी अभिनंदन केले.