जिल्हा शिक्षक बँकेत अखेर बाबाहेबांची  सन्मानपूर्वक प्रतिमा लावण्यात आली.

0
फोटो : बँकेतील बाबासाहेबांची पूर्वीची प्रतिमा व आंदोलनानंतरची प्रतिमा.(छाया-अनिल वीर)

सातारा : येथील जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या मुख्यालयातच अर्थात,शिखर बँक म्हणून असलेली बँकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अवमानकारक प्रतिमा केबिनमध्ये लावण्यात आली होती.तेव्हा घटनेच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांनी अर्धनग्न आंदोलन छेडण्यात आल्यानंतर बँकेने अखेर सन्मानपूर्वक प्रतिमा लावण्यात आली.

              जिल्हाध्यक्ष अशोकबापू गायकवाड व मातंग आघाडीचे राज्याध्यक्ष अण्णा वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड, शहराध्यक्ष अक्षय (भाऊ) कांबळे, राजू काकडे,रवींद्र बाबर,तुषार बोकेफोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, बँकेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा सन्मानपूर्वक लावण्यात आली. तदनंतर अभिवादन करून  आंदोलनकर्त्यांनी आंदोलन संपविले.तरीही बँकेतील वरिष्ठांनी सखोल चौकशी करून संबंधितावर योग्य ती कार्यवाही करावी.अशीही मागणी समाजघटकाकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here