राहुरी शहरातील चायना मांजा विक्रेत्यावर गुन्हा दाखल

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

                 चायना मांजावर प्रशासनाकडून बंदी असताना देखील राहुरी शहरातील विजय सिन्नरकर हा व्यापारी चायना मांजाची विक्री करताना आढळून आला. राहुरी पोलिस पथकाने दिनांक १० जानेवारी रोजी सायंकाळी सिन्नरकर याच्या दुकानात छापा टाकून सुमारे अडिच हजार रूपयांचा चायना मांजा जप्त करून गुन्हा दाखल केलाय.               मानवी व पशू पक्षांच्या जिवीतास धोका धोका निर्माण करणाऱ्या चायना मांजावर प्रशासनाकडून बंदी घालण्यात आलेली आहे. हे माहिती असताना देखील विजय सिन्नरकर हा व्यापारी त्याच्या दुकानात चायना मांजाची विक्री करत असल्याची माहिती पोलिस पथकाला मिळाली होती. त्यानूसार पोलिस पथकाने राहुरी शहरातील क्रांती चौक येथील हरि ओम अँण्ड माऊली जनरल स्टोअर या दुकानात छापा टाकला. तेव्हा तेथे बंदी असलेला चायना मांजा आढळून आला. दरम्यान त्या ठिकाणाहून २ हजार ५५० रूपये किंमतीचा चायना मांजा जप्त करण्यात आलाय.

          हवालदार संतोषकुमार वसंत राठोड यांच्या फिर्यादीवरून आरोपी विजय विठ्ठल सिन्नरकर, वय ४८ वर्षे, रा. मठ गल्ली, राहुरी. या व्यापाऱ्यावर गुन्हा रजि. नं. ३४/२०२३ भादंवि कलम ३३६ सह पर्यावरण कायदा कलम ५, १५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक आजिनाथ पालवे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here