सिन्नर शिर्डी महामार्गावर खाजगी बस- ट्रकच्या भीषण अपघातात १० भाविकांचा जागीच मृत्य !

0

सिन्नर :ठाणे येथून शिर्डीला जाणाऱ्या खाजगी आराम बस आणि मालवाहू ट्रकचा भीषण अपघात होऊन १० साईभक्तांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाल्याची दुर्घटना घडली . यामध्ये चार जण गंभीर जखमी असल्याची माहिती घटना स्थळी मदत कार्य करणाऱ्यांनी दिली आहे. नाशिक जिल्यातील सिन्नर-शिर्डी महामार्गावरील सिन्नर तालुक्यातील पाथरे गावाजवळ आज (१३ जानेवारी २०२३) सकाळच्या सुमारास या भीषण अपघाताची दुर्घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. जखमींना सिन्नर येथील शासकीय रुग्णालयात तर गंभीर जखमींना नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
खासगी आराम बस ठाणे येथून शिर्डीकडे येत होती . त्याच दरम्यान विरुद्ध दिशेने ट्रकने येऊन बसला धडक दिली . धडक एव्हढी भीषण होती की ट्रकने बसची एक बाजू पूर्णपणे कापत नेली . यामध्ये १० जण जागीच मृत्यू मुखी पडले . धडक दिल्यानंतर ट्रक रस्त्यावरच पलटी झाला होता , त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती . पोलिसांनी मोठ्या प्रयत्नाने वाहतूक सुरळीत केली.
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमधून १५ बस साईबाबांच्या दर्शनासाठी निघाल्या होत्या. अपघातग्रस्त बस ही त्यातलीच एक बस आहे.

अपघातग्रस्त बसमध्ये ठाण्यातील अंबरनाथमधील ५० भाविक होते. या बसला अपघात झाल्यानंतर त्याली १० जणांचा मृत्यू, तर उर्वरीत प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली.
जखमी प्रवाशांना तातडीने शिर्डी नाशिक या ठिकाणी हलवून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू करावेत, तसेच हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here