नवीन पीढीबरोबर वाटचाल केली तर समृद्धता येईल : अरुण कांबळे

0
फोटो : मार्गदर्शन करताना साहित्यिक अरुण कांबळे शेजारी शिरीष चिटणीस,प्राचार्य पाटणे व इतर.(छाया-अनिल वीर)

सातारा/अनिल वीर : आधुनिक व धावत्या युगात  नवनविन तंत्रज्ञान विकसित होत आहेत.मोबाईमुळे कोणाचेही नुकसान होत नाही. तेव्हा नवीन पिढीबरोबर वाटचाल केली तर नक्कीच समृद्धता येईल.असे प्रतिपादन ज्येष्ट साहित्यिक अरुण कांबळे यांनी केले.

                  येथील सारडा नगरी, जिल्हा परिषद मैदान येथे जिल्हा ग्रंथमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवेशद्वारास नागनाथ कोत्तापल्ले असे नाव देण्यात आले आहे.राजवाडा येथे लोकप्रतिनिधी अधिकारी – पदाधिकारी आदींच्या उपस्थितीत ग्रंथ दिंडीच्या पूजनाने सुरुवात करण्यात आली.तदनंतर जिल्हा परिषद मैदानावर  साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या हस्ते उदघाटन संपन्न झाले. तेव्हा ते मार्गदर्शन करीत होते.

   अरुण कांबळे म्हणाले, ग्रंथामुळेच सर्व व्यवस्था निर्माण होत असते.क्रांती- साम्राज्य या दुद्धा ग्रंथामुळेच निर्माण झालेली उदाहरणे आहेत.केळुसकर गुरुजींनी बाबासाहेबाना बुद्ध ग्रंथ दिला होता.छ.शाहु महाराजानी ग्रंथ वाचल्यानेच स्वतःहुन बाबासाहेबांची भेट घेतली होती. चेहरा ग्रंथ शिकवते. कविता धीर देते.शब्दांत ताकद मोठी आहे.ती पेटवते/विझवते. सर्व गोष्टीला शेवट (एन्ड) असतो. मात्र,ग्रंथास शेवट नसतो. ग्रंथ श्वास व डोळे आहेत.एक ग्रंथ वाचला तरी १० संवेदना निर्माण होत असतात.अशाप्रकारे ग्रंथमहोत्सवाचे कौतुक करून ग्रंथाचे महत्व विशद करीत उत्तम कांबळे यांनी सरकारवर चौफेर टीका केली. सरकार दुबळे असल्याने दुबळ्यांना सशक्त करण्याची योजना नाही.मदत म्हणून पैसे व रेशनिग देत आहे.मात्र,तो सक्षमपणे उभा राहण्यासाठी कोणतंही व्हिजन नाही.उलट महापुरुषांची नावे घेऊन भांडत आहेत.विकासावर चर्चा झाली पाहिजे.

    प्राचार्य यशवंत पाटणे म्हणाले, “पुस्तक भांडार असणे गरजेचे आहे.वाचन केले पाहिजे.”माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर म्हणाल्या,”ग्रंथामुळे बौद्धिक विकास होण्यास मदत होते. ग्रंथमहोत्सवाची २२ वर्षांची वाटचाल यशस्वी अशीच आहे. डॉ.आंबेडकर यांचे प्रेम ग्रंथ संपदावर होते.म्हणूनच त्यांनी संविधान लिहिले.”

    “माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी हिंदी दिन साजरा करण्याबाबतचा निर्णय घेतला होता.त्यापद्धतीने जागतिक मराठी फिन साजरा झाला पाहिजे.बंगाल राज्यासारखाच महाराष्ट्र वाचन संस्कृतीत आघाडीवर आहे.”असे विचार प्रास्ताविकपर शिरीष चिटणीस यांनी विविध उदाहरणाद्वारे स्पष्ट केले.

     यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांचेही अभ्यासपूर्ण असे भाषण झाले.सदरच्या कार्यक्रमास डॉ.राजेंद्र माने,प्रदीप कांबळे, वि.ना.लांडगे, जिल्ह्यातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शहर व लगतचे अध्ययनार्थी, साहित्यिक,रसिक, ग्रंथप्रेमी, पत्रकार आदी विविध क्षेत्रातील मान्यवर,अधिकारी, पदाधिकारी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here