*परीपाठ/पंचाग/दिनविशेष*

0
सौ . सविता देशमुख : उपशिक्षिका ,पाताळेश्वर विद्यालय पाडळी ता . सिन्नर *7972808064*

*❂ दिनांक :~ 14 जाने 2023 ❂**वार ~ शनिवार* 

*आजचे पंचाग* 

*पौष. 14 जानेवारी*

*तिथी : कृ. सप्तमी (शनि)*   

*नक्षत्र : हस्त,*

*योग :- अतिगंड*

*करण : बालव*

*सूर्योदय : 06:56, सूर्यास्त : 05:55,*

*सुविचार* 

*जेव्हा माणूस स्वतःवर, स्वतःच्या विकारांवर विजय मिळवतो तेव्हा त्याला हरवणारी दुसरी कोणतीही गोष्ट शिल्लक राहात नाही.*

*म्हणी व अर्थ* 

*अडाण्याची गोळी भल्यास गिळी*

*अर्थ:- अशिक्षीत माणूस कोणालाही अडचणीत आणू शकतो*

*दिनविशेष*     

*मकर संक्रमण*

*या वर्षातील 14 वा दिवस आहे.*

*महत्त्वाच्या घटना* 

*१९२३: विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली.*

*१९४८: ’लोकसत्ता’ हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले.*

*१९९४: मराठवाडा विद्यापीठाचा ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्यात आला.*

*१९९८: दाक्षिणात्य गायिका एम.एस. सुब्बलक्ष्मी यांना ‘भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च सन्मान जाहीर.*

*२०००: ज्येष्ठ समाजसेवक व गांधीवादी विचारवंत मुरलीधर देविदास ऊर्फ ’बाबा’ आमटे यांना १९९९ चा गांधी शांतता पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान.*

*जन्मदिवस / जयंती*

*१८८२: रघुनाथ धोंडो तथा र. धों. कर्वे – समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण यांसाठी बुद्धिवादी विचारप्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य करणारे विचारवंत, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र (मृत्यू: १४ आक्टोबर १९५३)*

*१८९६:रिझर्व बँक ऑफ ईंडिया’ चे पहिले गव्हर्नर सर चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख उर्फ सी. डी. देशमुख (मृत्यू: २ आक्टोबर १९८२)*

*१९०५: दुर्गा खोटे – हिन्दी व मराठी चित्रपटातील अभिनेत्री. सुमारे ५० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांत भूमिका केला. १९८२ मध्ये ’मी दुर्गा खोटे’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. (मृत्यू: २२ सप्टेंबर १९९१)*

*१९२३: चित्तरंजन कोल्हटकर – अभिनेते (मृत्यू: २५ आक्टोबर २००९)*

*१९७७: नारायण कार्तिकेयन – भारतीय फॉर्म्यूला कार रेसिंग ड्रायव्हर*

*मृत्यू / पुण्यतिथी*

*१७४२: एडमंड हॅले – हॅलेच्या धूमकेतूचा शोध लावणारे ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ, भूवैज्ञानिक, गणितज्ञ, हवामानशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ८ नोव्हेंबर १६५६)*

*१७६१: सदाशिवराव भाऊ – पानिपतच्या तिसर्‍या युद्धातील सरसेनापती (जन्म: ४ ऑगस्ट १७३०)*

*१७६१: विश्वासराव – पानिपतच्या ३ र्‍या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव (जन्म: २ मार्च १७४२)*

*१८९८: इंग्लिश लेखक आणि गणितज्ञ लुईस कॅरोल यांचे निधन.*

*१९२०: डॉज ऑटोमोबाईल कंपनीचे सहसंस्थापक जॉन फ्रान्सिस लबाडी यांचे निधन. (जन्म: २५ ऑक्टोबर १८६४)*

*१९९१: चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ ’चित्रगुप्त’ – संगीतकार (जन्म: १६ नोव्हेंबर १९१७)*

*२००१: फली बिलिमोरिया – माहितीपट निर्माते (जन्म: ? ? ????)*

*सामान्य ज्ञान* 

*स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते?* 

*नरेंद्र*

*दृकश्राव्य साधनात अत्यंत प्रभावी साधन म्हणून कशाचा उपयोग होतो?* 

*दूरदर्शन*

*गणित शास्त्राचा पाया कोणता आहे?* 

*अंकगणित*

*फुटबॉल या खेळात एकूण खेळाडूंची संख्या किती असते.?* 

*११*

*भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून कोणाला ओळखले जाते?*

*प्रतिभाताई पाटील*

*बोधकथा* 

*एक शेतकरी आणि कोल्हा* 

एकदा एक शेतरी लाकूड गोळा करण्यासाठी जंगलात गेला असता त्याला एक अद्भुत गोष्ट दिसली. कोल्ह्याला पाय नसले तरी तो आनंदाने स्वतःला फरकडत  पुढे चालत होता. कुठलीही शिकार पकडता येत नसताना तो कोल्हा कसा जगत असेल, असा विचार शेतकऱ्याने केला. तेव्हा त्याने पाहिले की एक सिंह दाता मध्ये शिकार घेऊन त्याच्याकडे येत आहे. सर्व प्राणी धावू लागले, तो शेतकरी ही झाडावर चढला. सिंह कोल्ह्या जवळ आल्याचे त्याने पाहिले. ते खाण्याऐवजी, प्रेमाने शिकारीचा एक छोटासा भाग टाकला आणि निघून गेला. दुसऱ्या दिवशीही त्याने पाहिले की सिंह मोठ्या प्रेमाने कोल्ह्याला खायला देऊन निघून गेला. या अद्भूत लीलेसाठी शेतकऱ्याने देवाला नमस्कार केला. तो ज्याला जन्म देतो त्याच्या भाकरीचीही व्यवस्था देव करतो हे त्याच्या लक्षात आले. हे जाणून तोही एका निर्जन ठिकाणी जाऊन अन्न शोधत शांतपणे बसला. बरेच दिवस झाले, कोणीच आले नाही. तो मरणासन्न अवस्थेत परत येऊ लागला. तेवढ्यात त्याला एक विद्वान महात्मा सापडला, त्याने त्याला अन्न-पाणी दिले तेव्हा तो शेतकरी त्याच्या पाया पडला आणि कोल्ह्याबद्दल सांगितले आणि म्हणाला, महाराज, त्या पांगळ्या कोल्ह्यावर देवाने दया केली, पण मी मरणारच होतो; देव माझ्यावर इतका क्रूर का झाला? महात्माजींनी त्या शेतकऱ्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि हसत हसत म्हणाले, तू इतका निर्बुद्ध झाला आहेस की तुला देवाचा संकेतही समजला नाही, म्हणूनच तुला एवढा त्रास सहन करावा लागला. तुम्हाला हे का समजत नाही की देवाला तुम्ही त्या सिंहासारखे मदतनीस हवे होते आणि असहाय्य कोल्ह्या सारखे नाही.

*बोध:-*

*आपल्या जीवनातही अनेकवेळा असे घडते की आपल्याला गोष्टी ज्या पद्धतीने समजल्या पाहिजेत त्याच्या उलट समजतात. देवाने आपल्या सर्वांमध्ये काही ना काही शक्ती दिल्या आहेत आपल्याला  ज्या महान बनवू शकतात.*

*भगवान श्रीकृष्णही गीतेत हाच उपदेश सांगत आहेत. कर्मयोगी व्हा.*

       

*एस बी देशमुख*मुख्याध्यापक :- पाताळेश्वर विद्यालय पाडळी, ता. सिन्नर* 

*सचिव:- बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर,**सचिव :- प. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे.*

* सौ. सविता देशमुख : उपशिक्षिका पाताळेश्वर विद्यालय पाडळी ता सिन्नर* *7972808064*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here