सातारा/अनिल वीर : स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती प्रित्यर्थ झालेल्या गीत मंच स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंबवडे संमत वाघोली येथील अध्ययनार्थी यांनी तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
स्वर्गीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेमध्ये २५ किलो वजनी गटामध्ये अथर्व निलेश सकुंडे इयत्ता चौथी या विद्यार्थ्यांने तृतीय क्रमांकाचे मानांकन तर ३० किलो वजनी गटामध्ये आदिती सुभाष सकुंडे या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांकाचे मानांकन प्राप्त केले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्त आयोजित केलेल्या घोषवाक्य लेखन स्पर्धेमध्ये ईश्वरी दत्तात्रय सकुंडे या विद्यार्थ्यांनीचा तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक तसेच स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती प्रित्यर्थ झालेल्या बीटस्तरीय स्पर्धेतील यश मिळाले आहे. शाहिरी पोवाडा स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक, वक्तृत्व स्पर्धेत सिद्धी महेश सकुंडे इयत्ता चौथी प्रथम क्रमांक, हस्ताक्षर स्पर्धेत ईश्वरी शिवाजी सपकाळ इयत्ता तिसरी प्रथम क्रमांक,निबंध स्पर्धेत विदिशा धनंजय काकडे इयत्ता तिसरी प्रथम क्रमांक, ६० मी. धावणे शरण्या उमेश सकुंडे इयत्ता चौथी द्वितीय क्रमांक, ६०० मी धावणे विराज गणेश अवघडे इयत्ता चौथी प्रथम क्रमांक, २०० मी. धावणे अथर्व निलेश सकुंडे तृतीय क्रमांक मिळविला आहे. या यशाबद्दल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे , विस्ताराधिकारी मनिषा चंदुरे,आणि वनिता मोरे तसेच केंद्रप्रमुख एस.बी. धनावडे, सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष , सदस्य, पालक,ग्रामस्थ या सर्वांनी अभिनंदन केले. या स्पर्धेमध्ये यश मिळवण्यासाठी मुख्याध्यापिका चव्हाण मॅडम व शिक्षिका सौ.गायकवाड मॅडम ,सौ सलगरे मॅडम व सौ फडतरे मॅडम यांनी मार्गदर्शन केले.