संगमनेर : गुरुवार दि. १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी केली जात असताना संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील श्री स्वामी समर्थ उद्योग समुहाच्या तरुंणानी भल्या पहाटे निझर्णेश्वर महादेव डोगंरावर भगवा ध्वज फडकावून ४२५ व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त अनोखी आदरांजली वाहिली.
गुरुवारी पहाटे आश्वी खुर्द येथील तरुण निझर्णेश्वर महादेवाच्या डोगंरावर गेले होते. यावेळी त्यांनी त्याठिकाणी असलेला जुना व खराब झालेला भगवा ध्वज खाली उतरवला व आपल्या बरोबर आणलेला नवा कोरा भगवा ध्वज फडकवला. यावेळी त्यांनी राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करत जिजाऊ वंदना गायीली. तसेच यावेळी या तरुंणानी त्याठिकाणी असलेल्या महादेवाच्या पिंडीवर जल अभिषेक देखील केला.
दरम्यान यावेळी जिजाऊ जयंतीनिमित्त उगवत्या सुर्याला भगव्याची मानवंदना देण्याचा अनोखा उपक्रम स्वामी समर्थ उद्योग समुहाचे संस्थापक संजय गायकवाड यांच्या पुढाकारातून साकारण्यात आला असून या उपक्रमात पपलेश लाहोटी, सचिन पोपळघट, कृष्णा हारदे व ऋषीकेष डमाळे आदि तरुण सहभागी झाले होते.