राजापूरच्या सरपंचपदी वंदना शरद आगवन यांची बिनविरोध निवड

0

येवला, प्रतिनिधी 

तालुक्यातील राजापूर- सोमठाणजोश ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंचपदी वंदना शरद आगवन यांची बिनविरोध निवड झाली.यापूर्वी दोन्ही टर्मला राजापूर येथील सरपंच असल्याने आता सोमठाण जोश गावाला संधी देण्यात आली आहे.

मागील वर्षभरापेक्षा अधिक कालावधीत येथील सरपंच पदी सरपच वंदना दत्तात्रय सानप यांनी कामकाज पाहिले.त्यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेसाठी वंदना शरद आगवन यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.  तालुक्यातील राजापूर सोमठाण जोश ही ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत असून सोमठाणजोश गावाला जनरल जागेतून गेल्या काही वर्षानंतर सरपंच पदाची संधी मिळाली आहे.

या निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.निवडणूक निर्णय अधिकारी मंडल अधिकारी कोळी यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामविकास अधिकारी आर.एस. मंडलिक यांनी मदत केली.मावळत्या सरपंच वंदना सानप यांनी नवनिर्वाचित सरपंच वंदना आगवन यांचा सत्कार केला.यावेळी उपसरपंच प्रकाश वाघ, माजी सरपंच नलिनी मुंढे,सदस्य ज्ञानेश्वर दराडे,माजी सरपंच व सदस्य सुभाष वाघ,लताबाई जाधव,अलका सोनवणे,  विजय ठाकरे,नामदेव पवार आदी सदस्य उपस्थित होते.यावेळी जेष्ठ नेते परसराम दराडे,दिनेश आव्हाड,एकनाथ वाघ,रमेश वाघ,रामभाऊ केदार,दत्ता सानप,  बाळासाहेब दाणे,पि.के.आव्हाड भाऊसाहेब बैरागी,दादाभाऊ विंचू,

ज्ञानदेव भोरकडे,शरद वाघ,कारभारी आगवन,रूपचद तांबे,निवृत्ती पठाडे, भाऊसाहेब आगवण,काशिनाथ पवार,सुरेश आगवन,गुलाब चवडगिर,

कमलाकर डावरे,हरिचंद्र ठाकरे,युवराज राठोड,नवनाथ राठोड,अण्णासाहेब मुंडे,सचिन जाधव,सुनिल मुंढे,  व राजापूर सोमठाण जोश येथील ग्रामस्थ उपस्थित होते.आगवण कुटुंबात काही वर्षानंतर सरपंच पदाचा मान मिळाला असल्याने सोमठाणजोश येथे आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

सोमठाण जोश-राजापूर येथील ग्रामस्थांनी विश्वास टाकून तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतच्या कामाची संधी दिली आहे.माझ्या कार्यकाळात विकासात्मक चांगली कामे करून पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करू असे सरपंच निवडीनंतर सौ.आगवन यांनी बोलताना सांगितले.

“पॅनलचे नेते व सदस्यांनी मला कामाची संधी दिल्यानंतर गेल्या वर्षभरात गावात अनेक विकासात्मक कामे करण्याला प्राधान्य दिले आहे.विविध शासकीय योजनांसह लोकप्रतिनिधींच्या माध्यमातूनही निधी उपलब्ध करून कामे करू शकलो,याचा आनंद आहे.यापुढेही भाजपाच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकास कामे गावाला मिळविण्यासाठी योगदान देत राहू.”

– वंदना दत्तात्रय सानप,माजी सरपंच, राजापूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here