अजित पवार म्हणतात, ‘सत्यजितबाबत बाळासाहेब थोरातांना अलर्ट केलं होतं’

0

पुणे:“नाशिकमध्ये काहीतरी वेगळं शिजतंय याची बातमी आपल्याला आधीच मिळाली होती. त्याबाबत आपण बाळासाहेब थोरात यांना अलर्ट केलं होतं. पण बाळासाहेब थोरात यांनी आपल्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवणुकीत दाखल केलेल्या अपक्ष उमेदवारी अर्जावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली.

अजित पवार म्हणाले, “दोन-तीन दिवसांआधी कानावर येत होतं. त्यावेळी मी स्वत: बाळासाहेब थोरात यांच्याशी बोललो की, असं काहीतरी कानावर ऐकू येतंय. तुम्ही काळजी घ्या. तुम्ही बघा, काही वेगळं शिजतंय अशी बातमी आहे. हे मी बाळासाहेब थोरातांना आदल्या दिवशी सांगितलेलं होतं”.

अजित पवारांच्या म्हणण्यानुसार, यावर बाळासाहेब थोरात म्हणाले की, “तुम्ही काळजी करु नका. आमच्या पक्षाची जबाबदारी आहे. आम्ही व्यवस्थित पार पाडू. उद्या डॉक्टर तांबे यांचाच फॉर्म भरला जाईल.”

दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय कुशलपणे राजकीय खेळी खेळल्याची चर्चा आहे. एकीकडे काँग्रेसचे उमेदवार सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरलेला नाही. त्यांनी आपला मुलगा सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिलाय. तर दुसरीकडे भाजपने उमेदवार उभा केलेला नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.

दुसरीकडे काँग्रेसकडून तांबे पिता-पुत्रांवर कारवाई केली जाणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. याशिवाय या घडामोडींमुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि तांबे यांच्या कुटुंबात गृहकलह सुरु असल्याची चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here