गयानातील भारतीय राजदूत डॉ के जे श्रीनिवास यांनी घेतले दैत्यगुरू शुक्राचार्य समाधीचे दर्शन

0

कोपरगाव : गयानातील भारतीय राजदूत डॉ के जे श्रीनिवास यांनी आज मकर संक्रांतीच्या शुभदिनाचे औचित्य साधत कोपरगाव येथील दैत्य गुरू शुक्राचार्य समाधीचे दर्शन घेतले.
जगातील एकमेव असलेल्या दैत्य गुरू शुक्राचार्य महाराजांच्या समाधीचे दर्शन व आशिर्वाद घेण्यासाठी डॉ के जे श्रीनिवास यांनी हे विशेष दौरा काढून (कोपरगाव बेट) मंदिरात आले होते . यावेळी त्यांनी गुरू शुक्राचार्य महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले त्यानंतर त्यांनी आवर्जुन मंदिराचा इतिहास तसेच मंदिराचे आणि या पवित्र स्थळाचे पुराणातील ऐतिहासिक महत्त्व जाणून घेतले. तसेच मंदिरात साजरे केले जाणारे उत्सव या बद्दल जाणून घेतले . त्याचप्रमाणे ट्रस्टद्वारे सुरु असलेल्या महाराज्यांच्या व मंदिर कार्याबद्दल विशेष कौतुक करत शुभेच्छा ही दिल्या.यावेळी मंदिर व्यवस्थापनाच्या वतीनेडॉ के जे श्रीनिवास यांचा शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला . यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड , मंदीर प्रमुख सचिन परदेशी, उप मंदिर प्रमुख प्रसाद पऱ्हे , नितीन भवर , संजय वडांगळे , बाळासाहेब गाडे , बाळासाहेब लकारे , भागचंद रुईकर व मंदिरातील गुरू , व्यवस्थापक व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here