वकील महिलेचा हात पकडत राजकीय पदाधिकाऱ्याने केला विनयभंग…

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
             राहुरी फँक्टरी येथिल भाऊसाहेब पगारे या आरपीआयच्या जिल्हाध्यक्षाने एका महिला वकिल तरूणीचा हात धरून तीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. आणि तूझ्या बहिनीचे जसे माझ्या बरोबर संबंध आहेत, तसेच तू माझ्या बरोबर संबंध ठेव. नाहीतर तूझा आणि तूझ्या भावाचा घातपात करून जिवे मारुन टाकीन. अशी धमकी दिली. ही घटना दिनांक ११ नोव्हेंबर रोजी घडली.शनिवारी राञी राहुरी पोलिस ठाण्यात एका वकील महिलेने फिर्याद दाखल केली.

         या घटनेतील ३८ वर्षीय वकिल तरूणी हिची बहिण व आरोपी आरपीआय (ए) पक्षाचा जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब शंकर पगारे, राहणार राहुरी फॅक्टरी. ता. राहुरी. यांचे प्रेम संबंध आहेत. आरोपी भाऊसाहेब पगारे हा नेहमीच वकिल तरूणीचा पाठलाग करून तीच्याशी जवळीक साधून बोलण्याचा प्रयत्न करायचा.
          वकिल तरूणीने व तीच्या नातेवाईकांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकत नव्हता. दिनांक ११ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळच्या वेळी वकिल तरूणी तीच्या राहुरी परिसरातील घरासमोर उभी होती. तेथे आरोपी भाऊसाहेब पगारे गेला. आणि तीचा हात पकडून म्हणाला कि, तूझ्या बहिनीचे जसे माझ्याशी संबंध आहेत, तसेच तूही माझ्याशी संबंध ठेव.नाहीतर तूझा व तूझ्या लहान भावाचा घातपात करून जीवे मारुन टाकीन. अशी धमकी देऊन तीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्या नंतर १३ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४.४५ वाजे दरम्यान ती वकिल तरूणी अहमदनगर येथील जिल्हा न्यायालय परिसरात असताना आरोपी भाऊसाहेब पगारे तेथे गेला.आणि म्हणाला कि, तू माझ्या बरोबर संबंध का ठेवत नाही. तू माझ्या बरोबर संबंध ठेव, मी तूला सुखात ठेवील. नाहीतर तूझ्या व तूझ्या भावा विरोधात तूझ्या बहिनीला खोट्या तक्रारी करण्यास सांगेन.
            त्यानंतर आरोपी भाऊसाहेब पगारे हा त्या वकिल तरूणीचा वारंवार पाठलाग करून त्रास देत होता.अखेर काल दिनांक १४ जानेवारी रोजी वकिल तरूणीने राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगीतला. तीच्या फिर्यादीवरून आरोपी आरपीआय (ए) पक्षाचा जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब शंकर पगारे याच्या विरोधात गुन्हा रजि. नं. ४४/२०२३ भादंवि कलम ३५४ (ड), ३५४, ५०६ प्रमाणे विनयभंग व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
            या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सुशांत दिवटे हे करीत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here