कोपरगाव ; कोपरगाव शहर आणि तालुक्यातील नाट्यप्रेमी जनता , नागरिक , शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी नाट्य कलाकार यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्य गृहाचे नूतनीकरण करण्याचा ठेका देऊन जवळपास दीड वर्ष लोटले आहे. परंतु अद्यापही काम सुरु होऊ शकले नाही . नगरपालिका प्रशासन नाट्य गृहाचे काम पूर्ण कधी करणार असा सवाल माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी पालिका प्रशासनास केला आहे.
पाटील पुढे म्हणाले की पालिका नगर सेवकांची मुदत संपण्याच्या आधी नाट्य गृहाच्या नूतनीकरणाच्या कामाचे टेंडर देऊन कार्यारंभ आदेश देण्यात आला होता.
नगरपालिकेत मुख्याधिकारी हे मुख्याधिकारी व प्रभारी नगराध्यक्ष ( प्रशासक ) म्हणून दोन्ही पदांवर काम करत आहे. नगरपालिकेचे प्रमुख म्हणून त्यांनी नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या कामाकडे लक्ष देऊन हे काम खरे तर चांगल्या दर्जाचे करून घ्यायला पाहिजे होते. मात्र अद्याप हे काम का पूर्ण झाले नाही, त्या निधीचे किती रक्कम आज पर्यंत खर्च केली व किती काम झाले याचा खुलासा नगरपालिकेने जनतेला करावा. अशी मागणीही त्यांनी यावेळी केली .
कोपरगावातील नाट्यप्रेमी कलाकार या नूतनीकरनची गेल्या अनेक वर्षांपासून वाट बघत होते. त्यांना प्रॅक्टिस साठी व नाट्य प्रयोग करण्यासाठी हे नाट्यगृह पूर्ण होणे गरजेचे होते. पुढील महिन्यापासून शहरातील प्रत्येक शाळेमध्ये लहान मुलाचे स्नेहसंमेलन (गॅदरिंग), होईल यादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम शाळेतील मुलांना तसेच हौशी, आणि इतरही कलाकारांना आपले कलागुण सादर करण्यासाठी अत्यंत सोईचे आहे . असे असताना पालिका प्रशासन नाट्य गृह नूतनीकरणास विलंब का करीत आहे . हे कळण्यास मार्ग नाही.
यापूर्वी सांगितले जायचे की निधी नाही आणि आता मोठा निधी (१ कोटी रुपये )उपलब्ध होऊन देखील गेल्या वर्षी पासून काम होत नाही.याचा खुलासा पालिकेने करावा व याला जबाबदार कोण हे सांगावे. जनता कर व टॅक्स भरते . भरलेल्या करातून पैशातून शासन नगरपालिकेला जनतेच्या हिताचे काम करण्यासाठी पैसे देते, म्हणून जनतेला त्या कामाबद्दल व निधीच्या विनियोग कसा व किती झाला व कामाचे स्टेटस विचारण्याचा हक्क आहे. तरी हे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी पाटील यांनी केली आहे.