संगमनेर : संगमनेर तालुका कलाध्यापक संघ आयोजित तालुकास्तरीय रंगभरण स्पर्धेत महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित तळेगाव दिघे येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी सिद्धांत हरिभाऊ दिघे याने इयत्ता ७ वी ते ८वी गटात शालेय स्तरावर प्रथम क्रमांक मिळविला असून त्याने तालुका स्तरावर उत्तेजनार्थ बक्षीस मिळवीत सुयश संपादन केले.
संगमनेर तालुका कलाध्यापक संघ आयोजित तालुकास्तरी रंगभरण स्पर्धेत १४ हजार विद्यार्थी बसलेले होते. सिद्धार्थ हरिभाऊ दिघे याने ७ वी ते ८ वी गट क्रमांक तीन मध्ये शालेय स्तरावर प्रथम क्रमांक मिळविला. त्यास तालुका स्तरावर उत्तेजनार्थ प्रमाणपत्र, बक्षीस आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याकामी सिद्धांत दिघे यास कलाशिक्षक बाबा जगताप यांचे मार्गदर्शन लाभले. या परीक्षेत विद्यालयातील ४४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सिद्धांत हा प्राचार्य हरिभाऊ दिघे यांचा चिरंजीव असून त्याचे या यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव जोंधळे, कार्यकारी संचालक प्रा. दिपक जोंधळे, संस्थेचे कार्याध्यक्ष दत्ताभाऊ जोंधळे, विद्यालयाचे प्राचार्य एच. आर. दिघे, उपमुख्याध्यापक एस. के. दिघे, पर्यवेक्षक बी. सी. दिघे सहित मान्यवरांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.