माहूर गडावर मकर संक्रांतीला  रेणुकादेवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी:

0
फोटो ओळी: मकर संक्रांति निमित्त श्री रेणुका देवीच्या दर्शनाकरिता माहूर गडावर रविवारी भाविकांची दर्शनाकरिता मोठी गर्दी झाली होती तर वाहनांच्या रांगा रस्त्याच्या दूतरफा लागलेल्या होत्या.

हजारो भाविकांनी घेतले दर्शन माहूर :- महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या  माहूर गडावर मकरसंक्राती निमित्त रविवारी भाविकांची गर्दी उसळली होती़.श्री रेणुका देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी शनिवार – रविवार सुट्टीचा योग साधत माहूर गडावर गर्दी केल्याने खाजगी वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
                          दोन्ही बाजूने वाहने पार्किंग केल्याने वाहनाला वाट काढणे अवघड झाले होते.नवरात्र उत्सवात जशी गर्दी असते तशीच भाविकांची गर्दी आज दिसून आली.कोरोना काळात मंदिर बंद होते,त्या नंतर भाविकांसाठी मंदिर दर्शन खुले करण्यात आल्या नंतर येणाऱ्या प्रत्येक सुटी व सणाच्या कालाधीत गर्दीत भर पडत आहे.वेळोवेळी निर्माण होणाऱ्या वाहतुकीची समस्या कायम स्वरुपी निकाली काढण्यासाठी शनिवार, रविवार आणि सणासुदीच्या काळात  वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात यावी अशी अपेक्षा भाविक व्यक्त करीत आहे.
……………………….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here