आ.बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील रस्त्यांसाठी २१ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर

0

संगमनेर  : काँग्रेस पक्षाचेेे वरिष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्यातील विकास कामांची घोडदौड सुरू असून आमदार थोरात यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तालुक्यातील रस्त्यांसाठी २१ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती सहकाार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली.
          रस्त्यांच्या निधीबाबत माहिती देताना इंद्रजीत थोरात म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे कालव्यांच्या कामाला अत्यंत गती दिली होती. या कालव्यासाठी मोठा निधी मिळून रात्रंदिवस कामे सुरू ठेवले होते. मात्र नवीन सरकार आले आणि या नवीन सरकारने अनेक कामांना स्थगिती दिली. मात्र आमदार थोरात यांनी विविध गावांमधील सुचवलेले रस्ते व विकास कामांसाठी निधी आता मंजूर झाला आहे. मागील आठवड्यात पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत विविध रस्त्यांसाठी ३२ कोटी ३६ लाख रुपयांचा निधी मिळवला. तर आता नव्याने तालुक्यातील विविध रस्त्यांकरता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून २१ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.या अंतर्गत रणखांबवाडी फाटा- रणखांबवाडी ते कुंभारवाडी, वरवंडी या १५ किलोमीटर रस्त्यासाठी ११ कोटी २५ लाख रुपये निधी, राजापूर ते राष्ट्रीय महामार्ग ५० चिखली ५ किलोमीटर रस्त्यासाठी ३ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी , पिंपरणे ते कोळवाडे, शिरापूर या ५ किलोमीटर रस्त्यासाठी ३ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी आणि तळेगाव दिघे ते तालुका हद सायाळे या ४ किलोमीटर रस्त्यासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.या विविध रस्त्यांच्या कामांसाठी मिळालेल्या निधीमुळे तालुक्यातील रस्त्यांचे जाळे आणखीच मजबूत होणार आहे. या मिळालेल्या निधीतून रस्त्यांच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याने तळेगाव दिघे, पिंपरणे ,कोळवाडे, राजापूर ,चिखली ,रणखांबवाडी, कुंभारवाडी, वरवंडी या गावांमधील नागरिकांनी आमदार बाळासाहेब थोरात यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here