*परीपाठ/पंचाग/दिनविशेष* 

0
*सौ . सविता देशमुख : उपशिक्षिका पाताकेश्वर विद्यालय पाडळी सिन्नर*  *7972808064*

*❂ दिनांक :~ 17 जाने 2023 ❂**वार ~ मंगळवार* 

*आजचे पंचाग* 

*पौष. 17 जानेवारी*

*तिथी : कृ. दशमी (मंगळ)*   

*नक्षत्र : विशाखा,*

*योग :- शूल*

*करण : बव*

*सूर्योदय : 06:55, सूर्यास्त : 05:56,*

*सुविचार* 

*प्रत्येक लहान गोष्टी मध्ये केलेली सुधारणा*

*मोठ्या यशाच्या जवळ घेऊन जाते…..*

*म्हणी व अर्थ* 

*जमिनीचे फूल, चालवी जगाची चूल.*

*अर्थ:- जमिनीच्या वरच्या थरात पिके पिकतात.*

*दिनविशेष*     

*जागतिक धर्म दिन*

*या वर्षातील 17 वा दिवस आहे.*

*महत्त्वाच्या घटना* 

*१७७८: कॅप्टन जेम्स कूक हे हवाई बेटांवर पोचणारे पहिले युरोपियन ठरले.*

*१९११: युजीन बी. इलाय यांनी सॅन फ्रान्सिस्कोच्या बंदरात उभ्या असलेल्या यु. एस. एस. पेनसिल्व्हेनिया या जहाजावर विमान उतरवले. जहाजावर विमान उतरण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.*

*१९५६: संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईमध्ये गोळीबार. यात १० लोक ठार, २५० जखमी, दंगल वाढल्याने २४ तास कर्फ्यू लावण्यात आला.*

*१९९७: नॉर्वेच्या बोर्ग औसलँडने एकट्याने अटलांटिक महासागर पार केला.*

*१९९९: नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.*

*२००५: एअरबस ए-३८० या जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमनाचे अनावरण करण्यात आले.*

*जन्मदिवस / जयंती*

*१४७१: भारताचे महान सम्राट कृष्णदेवराय यांचा जन्म.*

*१७०६: बेंजामिन फ्रँकलिन – अमेरिकन संशोधक आणि मुत्सद्दी (मृत्यू: १७ एप्रिल १७९०)*

*१८९५: लेखक व शिक्षणतज्ञ, रविकिरण मंडळातील एक कवी विठ्ठल दत्तात्रय तथा वि. द. घाटे यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे १९७८)*

*१९०८: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव ऊर्फ एल. व्ही. प्रसाद यांचा जन्म. (मृत्यू: २२ जून १९९४)*

*१९१७: अभिनेते व तामिळनडुचे मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर १९८७)*

*१९१८: टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रुसी मोदी यांचा जन्म. (मृत्यू: १६ मे २०१४)*

*१९१८: चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथाकार व कवी सईद अमीर हैदर कमाल नक्‍वी ऊर्फ ’माल अमरोही यांचा जन्म. (मृत्यू: ११ फेब्रुवारी १९९३)*

*१९३२: साहित्यिक मधुकर केचे यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च १९९३)*

*मृत्यू / पुण्यतिथी*

*१५५६: दुसरा मुघल सम्राट हुमायून यांचे निधन. (जन्म: ७ मार्च १५०८)*

*१८९५: मराठी लेखक आणि शिक्षणतज्ज्ञ विठ्ठल दत्तात्रय घाटे यांचे निधन.*

*१९७१: स्वातंत्रसैनिक, घटनातज्ज्ञ बॅ. नाथ बापू पै यांचे ह्रुदयविकाराने निधन. (जन्म: २५ सप्टेंबर १९२२)*

*१९९५: ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक डॉ. व्ही. टी. पाटील यांचे निधन.*

*२०१०: प. बंगालचे मुख्यमंत्री ज्योति बसू यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १९१४)*

*२०१३: मराठी व हिन्दी लेखिका आणि आकाशवाणी निर्मात्या ज्योत्स्‍ना देवधर यांचे निधन. (जन्म: २७ फेब्रुवारी १९२६)*

*२०१४: बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेत्री रमा दासगुप्ता तथा सुचित्रा सेन यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १९३१ – पाबना, पाबना, बांगला देश)*

*सामान्य ज्ञान* 

*ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण?*

*वि.स. खांडेकर* 

*मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते?* 

*दर्पण*

*शिर्डी हे धार्मिक स्थळ कोणत्या तालुक्यात आहे?*

*राहता*

*महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री कोण ?* 

*यशवंतराव चव्हाण*

*महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते?* 

*गंगापूर*

*बोधकथा* 

*कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको*  

*एकदा एक राजहंस एका बगळय़ाला म्हणाला, ‘काय रे, तू आधाशी! पाण्यातला कोणताही प्राणी खायला तू मागे-पुढे पाहात नाहीस. बरे-वाईट, नासके-चांगले हा फरकसुद्धा तुझ्या खादाड जिभेला समजत नाही. माझे पाहा, मी फक्त पूर्ण उमललेल्या कमळातले तंतू तेवढे खाईन, दुसरा कसलाही पदार्थ माझ्या घशाखाली जाणार नाही.’ त्यावर बगळा म्हणाला, ‘माझ्या दृष्टीने असा चोखंदळपणा असणे बरे नव्हे. ज्यावेळी जे मिळेल ते खावे अन् सुखी राहावे. खाण्याचा पदार्थ दिसला की, तो खावा हेच शहाणपणाचे.’ असे म्हणून बगळा उडाला व जवळच्या तलावाकाठी गेला. तेथे कडेला एक मासा दिसला. तेव्हा विचार न करता त्याने तो एकदम गिळला, पण आत असलेला गळ घशाला लागून तो जिवास मुकला. राजहंस आपले आवडते खाणे खाण्यासाठी दुसर्‍या कमळे असलेल्या तळय़ात गेला, पण तेथे हंस धरण्यासाठी जाळे लावले होते. त्यात तो सापडला.* 

*तात्पर्य : – कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको.*

*बी एस देशमुख : मुख्याध्यापक :- पाताळेश्वर विद्यालय पाडळी, ता. सिन्नर* 

*सचिव:- बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर,**सचिव :- प. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे*

*सौ . सविता देशमुख : उपशिक्षिका पाताकेश्वर विद्यालय पाडळी सिन्नर*  *7972808064*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here