माहूर – अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव न दिल्यास महाराष्ट्रभर आंदोलन छेडणार असल्याचा इशारा धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला असून तसे निवेदन माहूरचे तहसिलदार किशोर यादव यांना सोमवारी देण्यात आले.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या भारत देशाच्या प्रेरणास्थान आहेत. मोघल, निजामशाहीत व हिंदू संस्कृतीवर होणाऱ्या हल्ल्यावर त्यांनी लगाम लावला होता. हिंदू संस्कृतीत त्यांनी प्राण फुंकले, त्यांनी अनेक घाट बांधले, बारव बांधले, मंदिरे बांधली, मंदिराचे पुर्ननिर्माण केले. स्त्रियांना सन्मान मिळवून दिला. अशा थोर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव अहमदनगर जिल्ह्याला देण्यात यावे, तसे न झाल्यास धनगर समाज संघर्ष समिती,महाराष्ट्र राज्य च्या वतीने भूषणसिंहजी होळकर,मा.खा.डॉ. विकास महात्मे, आ.गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात किनवट-माहूर तालुक्यासह नांदेड जिल्हयात व संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडणार असल्याचा इशारा तहसिलदार माहूर यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.या निवेदनावर प्रदेशाध्यक्ष, सोशल मिडीया धनगर समाज संघर्ष समिती, म.रा. व युवक प्रदेशाध्यक्ष, जय मल्हार युवा मंचाचे अमन कुंडगीर,लव गांवडे,लक्ष्मण गांवडे,अक्षय डुरके,निखिल गांवडे,नरेश घोरपडे,राजु सौंदलकर,शैलेश चिंचोडे, मनोहर दबडे,संदेश गावंडे,पृथ्वीराज साताळे,पवन पांढरे,प्रविण मुसळे, दक्षय लकडे,अच्युत गवंडे,सुरज कोरके,गणेश डुकरे,वैभव गंधे,शंकर भंडारे,सिनु गटलेवार,शरद चोरंडे,तुषार चिंचोडे,अमोल चिचोंडे,पांडुरंग कवडे यांच्या साक्षर्या आहेत.