माहूर तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न

0
फोटो ओळी: माहूर तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी नांदेडचे अपर जिल्हाधिकारी श्री बोरगावकर, सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले, माहूरचे तहसीलदार किशोर यादव, किनवटच्या तहसीलदार मृणाल जाधव उपस्थित होते. (छायाचित्र बालाजी कोंडे)

महसूल उद्दिष्ट पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
………………………………………………………………
माहूर : नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज माहूर तहसील कार्यालयात माहूर किनवट या दोन्ही तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. सदरील बैठकीत महसूल उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.
                                  माहूर तहसील कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी दुपारी चार वाजता नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस नांदेडचे अपर जिल्हाधिकारी श्री बोरगावकर, सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले, माहूरचे तहसीलदार किशोर यादव, किनवटच्या तहसीलदार मृणाल जाधव उपस्थित होते.
                           जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी माहूर व किनवट तालुक्यातील प्रत्येक गावनिहाय, विभाग निहाय आढावा घेऊन महसूल उद्दिष्टा उद्दिष्ट पूर्ती करण्याचे आदेश दिले. गौण खणीज,महसुली वसुली लवकरात लवकर करण्यात झाली, पाहिजे चाल ढकल करू नका अन्यथा योग्य कारवाई करण्यात येईल असा इशाराही दिला.
                              माहूरचे तहसीलदार किशोर यादव  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा पुष्पगुच्छ व श्री रेणुका देवीचा फोटो देऊन सत्कार केला. तसेच नांदेडचे अप्पर जिल्हाधिकारी श्री बोरगावकर, सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले,किनवटच्या तहसीलदार मृणाल जाधव यांचा ही श्री रेणुका देवीचा फोटो व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.बैठकीस माहूर किनवट तालुक्यातील तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, महसूल कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here