वैजापूर : विहिरीत पडून २९ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला. ही घटना रघुनाथपूरवाडी (ता. वैजापूर) येथे २६ सप्टेंबरला सायंकाळी घडली.
सुनंदा संदीप जाधव असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. घराशेजारी असलेल्या सरकारी विहिरीत त्या पडल्या. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात
आल्यावर पोलिसांना कळविण्यात आले. सहायक पोलीस निरिक्षक संदीप पाटील व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने तिचा मृतदेह
विहिरीबाहेर काढला. मृतदेहाची उत्तरीय तपासणी शिऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली.