सांगली : सांगलीतल्या एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कॉलेजमधल्या सिक्युरिटी गार्डकडून क्षुल्लक कारणावरुन विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. इतक्याचवरच ते थांबले नाहीत. तर विद्यार्थी तिथून निघून गेल्यानंतर त्यांच्या घरात घुसून पुन्हा त्यांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल केली. यात काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. याप्रकरणी चार सिक्युरिटी गार्डवर सांगलीतल्या संजयनगर आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सांगलीतील एका प्रसिद्ध कॉलेजमधील बी सी एसच्या दुसऱ्या वर्गातील विद्यार्थी परिक्षा झाल्यावर घरी जात असताना कॉलेजच्या आवारत असलेल्या गाड्यांजवळ सेल्फी काढत होते. त्याचवेळी कॉलेजचे दोन-चार सिक्युरीटी गार्ड तिथे आले आणि त्यांनी विद्यार्थ्याना लाठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीत विद्यार्थ्यांच्या पाठिवर, खांद्यावर आणि डोक्यावर लाठीने हल्ला केला.
विद्यार्थी घाबरून घराकडे पळून गेले. पण सिक्युरिटी गार्डने विद्यार्थ्यांचा पाठलाग करून त्यांच्या घरापर्यंत जाऊन पुन्हा त्यांना जबर मारहाण केली. यात अथर्व कदम या विद्यार्थ्याला सिक्युरिटी गार्डने जबर मारहाण केली. त्यांने विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून त्याला उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयता पाठवण्यात आल.
तर सिक्युरिटी गार्डने पियुश जाधव आणि प्रणित या अठरा वर्षांच्या मुलांना घराजवळ जाऊन जबर पुन्हा मारहाण केलं, यात ते विद्यार्थी जखमी झाले. याप्रकरणी कॉलेजच्या सुरज सूर्यवंशी, सोनल आणि अन्य दोन सेक्युरिटी गार्ड यांच्या विरोधात संजय नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विद्यार्थ्यांना पाठलाग करून अमानुष मारणे, शिव्या देणे, धमकी अशा प्रकारचे संजय नगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकाराने पालकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.