देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
राहुरी तालुक्यात शेतकरी वर्गाच्या विद्यूत पंप, केबल साहित्य चोरीला जाण्याच्या घटना सातत्याने वाढत असल्याने पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांनी आक्रमक आक्रमक भुमिका घेऊन राहुरी शहर, वांबोरी, देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरातील सात भंगार खरेदी करणाऱ्या दुकानांवर एकाच वेळी धाडी टाकुन चोरीचे विद्यूत पंप खरेदी केले आहे की याची शहानिशा केली . यावेळी पोलीस निरीक्षक डांगे यांनी सबळ पुराव्याशिवाय भंगार खरेदी करू नये असा सज्जड दम हि भरला असल्याची चर्चा तालुक्यात सुरु आहे.
राहुरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून क्षेत्रातून विद्यूत पंप व केबल चोरीला जाण्याचे प्रमाण वाढल्याने बळीराजा हताश झाला आहे. राहुरी पोलिसांत याबाबत अनेक शेतकऱ्यांनी फिर्यादी दाखल करुनही चोरट्यांचा तपास लावण्यात पोलिसांना अपयश आले होते. चोरीचे विद्यूत पंप व केबल भंगार दुकानदारांना विकल्या जात असल्याची गोपनिय माहिती पोलिस निरीक्षक डांगे यांना मिळाली होती.
गोपनिय माहिती नुसार चोरी गेलेले विद्यूत पंप, केबल व इतर साहित्य भंगार दुकानांमध्ये शोधण्यासाठी पोलीस निरीक्षक डांगे यांनी वेगवेगळे पथक तयार करून राहुरी फॅक्टरी, राहुरी शहर, वांबोरी, सोनई हद्दीतील भंगार दुकानांमध्ये छापा टाकून.विद्युत पंप व केबल आदी साहित्याचा शोध घेण्यात आला परंतू एका हि भंगार दुकानदारांनी आम्ही त्यातले नाहीच असा पविञा घेवून खुशाल दुकानाची तपासणी करा असा उलटा सल्ला पोलिसांना दिला. विद्यूत पंप दुरुस्ती दुकानातही पोलिसांनी विद्यूत पंपाबाबत विचारपूस केली.
पोलिसांच्या पथकाने दुकानदारांची चौकशी करून भंगार खरेदी कागदपत्रांची तपासणी केली. चोरीचे विद्यूत पंप व इतर संशयित खरेदी व विक्रीबाबत पोलिसांकडून चौकशी केली. पोलिसांनी माञ ‘डोंगर पोखरुन उंदिर काढला’ तालुक्यातील एकाही चोरीचा तपास अद्यापही लागलेले नाही. जात आहे. तालुक्यातील काही शेतकऱ्यांना बोलाऊन घेत पोलिसांनी विद्यूत पंपाबाबत माहिती घेतली.राहुरी तालुक्यातील भंगार विक्री करणाऱ्या दुकानांवर पोलिसांनी अचानक छापे टाकल्याने दुकानदारांची मात्र चांगली धावपळ उडाली. या पथकात पोलिस निरीक्षक डांगे यांनी पोलिस उपनिरीक्षक निरज बोकील, चारूदत्त खोंडे यांसह पोलिस हवालदार प्रभाकर शिरसाठ, अशोक शिंदे, सुचिन ताजणे, नदीम शेख, अजिनाथ पाखरे, प्रमोद ढोकणे, शशिकांत वाघमारे आदींचा समावेश होता.