२६ जानेवारी रोजी बैलगाडा शर्यतीचा थरार

0

वरकुटे-मलवडी : वार्ताहर….

     पुळकोटी ता.माण येथे २६ जानेवारी रोजी माजी सनदी अधिकारी आणि माण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.

      बैल आणि शेतकरी हे नाते पूर्वापार चालत आलेले असून,बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ म्हणून ओळखला जातो.मात्र त्यावरही न्यायालयाने घातलेली बंदी उठल्याने शर्यतीच्या बैलगाड्यांचे मालक आणि शौकीनांमध्ये कमालीचे समाधानकारक वातावरण आहे. दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण तालुक्यातील पुळकोटी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उपसरपंच सोमनाथ यादव व पैलवान विशाल जाधव देवापूर यांच्याकडून या बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.यासाठी प्रथम क्रमांक रू.५१०००, द्वितीय ३१०००, तृतीय २१०००,चौथे १५०००,पाचवे,११०००,सहावे ७०००,सातवे ३०००,आठवे २००० आणि प्रत्येक बक्षीसाबरोबर कै.आण्णासाहेब माने यांचे स्मरणार्थ अण्णासाहेब मित्र मंडळ म्हसवड यांच्याकडून सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.पुळकोटी-म्हसवड रस्त्यावर असणाऱ्या मेगासिटीजवळ बिरोबा मंदिराशेजारी या बैलगाडा स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे.तरी महाराष्ट्रातील सर्व बैलगाडा मालकांनी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी ९५९५३३१६०० व ८४५९८२७३७१ या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा व शर्यतीच्या शौकिनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पुळकोटीचे उपसरपंच सोमनाथ यादव यांच्याकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here