देवळाली प्रवरा /राजेंद्र उंडे
काँग्रेस पक्षात चांद्या पासुन बांद्या पर्यंत 22 वर्ष काम केले.काँग्रेस पदाधिकाऱ्यांना निवडणूक जाहिर होताच आमची उमेदवारी जाहिर करु नका, आमच्या पिता पुञा पैकी कोणीही एक जण उमेदवारी करेल परंतू काँग्रेसने घाईघाईने डाँ.सुधीर तांबें यांची उमेदवारी जाहिर केली.परंतु पित्याच्या इच्छे नुसार पुञाने उमेदवारी केली आहे.त्यामुळे ऐनवेळी अपक्ष उमेदवारी दाखल केली.मी अपक्ष उमेदवार नाही,तर सर्वपक्षीय उमेदवार आहे.असे नाशिक पदवीधर मतदार संघाचे उमेदवार सत्यजित तांबे देवळाली प्रवरा येथिल पदवीधर मतदारांच्या भेटीला आले असताना मतदारांसमोर बोलताना सांगितले.
देवळाली प्रवरा येथिल काँग्रेसचे सरचिटणीस अजय खिलारी यांनी नाशिक पदवीधर मतदार संघाचे उमेदवार सत्यजित तांबे पदवीधर मतदारांच्या भेटीला आले असता देवळाली प्रवरा येथिल अजय खिलारी मिञ मंडळाच्या वतीने स्वागत करुन मतदारांशी चर्चा विनिमय करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.त्या वेळी तांबे बोलत होते.
यावेळी माजी प्राचार्य सुर्यभान कदम, डाँ.अशोक मुसमाडे,कृष्णा मुसमाडे, अजय खिलारी, दिपक पठारे,कुणाल पाटील,डाँ.भागवत वीर,राजेंद्र बोरुडे,किरण कडू,संजय चव्हाण आदीसह पदवीधर मतदार उपस्थित होते.
यावेळी तांबे बोलताना म्हणाले की,काँग्रेसमध्ये 22 वर्ष चांद्या पासुन बांद्या पर्यंत काम केले. आ.डाँ.सुधीर तांबे वडील म्हणून पाठीशी उभे राहिले.पक्षाला उमेदवारी बाबत कल्पना दिलेली होती. आमच्या दोघांपैकी एक जण उमेदवारी करेल त्यामुळे उमेदवारी जाहिर करताना नावाची घोषणा करु नका असे सांगितले होते.परंतु काँग्रेस पक्षाने घाई केली आ.डाँ.सुधीर तांबेंची उमेदवारी जाहिर केली. वडील या नात्याने माझ्या पाठीशी उभे राहिले आहे. काँग्रेसने घाई केली नसती तर आज काँग्रेसचाच उमेदवार असतो.गेल्या तीन निवडणूकीत मतदारांनी पक्ष न पाहता आम्हाला मदत केली.त्याच प्रमाणे या हि निवडणूकीत मतदार मतदान रुपाने मदत करतील असा विश्वास तांबे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी डाँ.अशोक मुसमाडे, सतिष वाळूंज,अजय खिलारी आदींचे भाषणे झाली. कार्यक्रमाचे सुञसंचालन व आभार प्रदर्शन राजेंद्र बोरुडे यांनी केले.
तांबेंनी काँग्रेसवर टिका टाळली
काँग्रेस उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी एबी फाँर्म कोरा दिला असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहिर केले होते याबाबत पञकारांनी छेडले असता त्यांनी यावर त्यांनी बोलणे टाळून काँग्रेसवरही टिका करण्याचे टाळले आहे.याच दरम्यान नाशिक पदवीधर मतदार संघातील उपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचे काँग्रेस मधुन सहा वर्षा साठी निलंबन केल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.