1987 बॅचच्या 10 विच्या विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन उत्साहात साजरा.

0

उरण दि 20(विठ्ठल ममताबादे )

शाळेतील गोड आठवणींना उजाला देण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल विन्हेरे महाड, इ. 10 वी बॅच सन 1987 यांनी प्रथम स्नेह संमेलन पनवेल येथील हॉटेल पार्क इन येथे आयोजीत केले होते.आणि त्याला सर्व बाल मित्रांनी भरभरून साथ दिल्ली. मैत्रीच्या ओढीने जवळ जवळ सर्वजण  पुणे, ठाणे, मुंबई- महाड येथून आले होते.या संमेलनात या मित्रांनी त्याच्या गुरुजनांना बोलवून त्यांचा यथोचित आदर सत्कार केला. व त्यांच्या प्रती असलेली आपली कृतज्ञता व्यक्त केली. सवानी आपापली ओळख करून दिली.खूप मजा मस्ती करत जुन्या आठवणीत रमत हे स्नेहसंमेलन आनंदात पार पाडले.

तदनंतर – वर्षांनी पुन्हा एकदा या मित्रपरिवाराने  स्नेहसंमेलन त्याच उत्साहात पुष्प वाटिका रिसॉर्ट, पाले बुद्रुक, पडगा जवळ, पनवेल येथे आयोजीत करण्यात आले होते. आणि पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा देत भविष्याचे आराखडे बांधत, सर्वांनी खूप मजा-मस्ती केली व या सर्वानी सर्व गोड आठवणींना कॅमेरामध्ये बंद करून घेतले.हे स्नेहसंमेलन यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी, सर्वच मित्रांनी अथक परिश्रम घेतले. बालपणीचे सर्व मित्र -मैत्रीणी यांनी साथ देऊन कार्यक्रम यशस्वी केला . या स्नेह संमेलनाच्या मधुर आठवणी दिर्घकाळ प्रत्येकाच्या मनात रेंगाळत राहतील अशा पद्धतीचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.

10 वी नंतर अनेक विद्यार्थी एकमेकांना भेटत नाहीत. तर अनेक मित्र 10 वी नंतर काही 5 वर्षांनी काही मित्र 10 वर्षांनी एकमेकांना भेटतात. तर काही मित्र एकमेकांना भेटत सुद्धा नाहीत. लहानपणीचे तसेच शाळेतील आठवणी कोणीच विसरू शकत नाही. तेंव्हा अशा आठवणींना उजाळा देण्याच्या उद्देशाने स्नेहसंमेलन आयोजित करण्याची संकल्पना सुचली व सर्वांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने स्नेहसंमेलन आयोजित केले. दरवर्षी या स्नेह संमेलनाला सर्वच मित्रांचा उत्तम प्रतिसाद मिळत असतो.असे नितीन गावंड यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here