शनी अमावस्येला माहूर गडावरील कैलास टेकडी येथे भाविकांची मोठी गर्दी

0

माहूर: माहूर गडावरील कैलास टेकडी येथे शनिवारी दर्श अमावसे निमित्त दर्शनाकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीमुळे बराच वेळ परिसरातील ट्रॅफिक जाम होती. शैक्षणिक सहली करिता आलेल्या विद्यार्थ्यानाही ट्राफिक जामचा त्रास सहन करावा लागला आहे.
                                    माहूर गडावरील रेणुका देवी ते दत्तशिखर रोड वर वनदेव कैलास टेकडी कडे जाणाऱ्या मार्गावर ट्रॅफिक जाम झाल्याने भाविकांसह शैक्षणिक सहली साठी आलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला.आज दर्श आमावस्या असल्याने भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.
                        माहूर येथील कैलासटेकडी ही सहयाद्री पर्वतावरील सर्वात उंच टेकडी असून अत्‍यंत जागृत ठिकाण आहे. दत्‍तात्रयांच्‍या पादुका ह्या ठिकाणी आहे. हृया ठिकाणी भगवान दत्‍तात्रयांनी गोरखनाथांना दर्शन दिले होते असे हे पवित्र ठिकाण असल्याची आख्यायिका आहे. मागील चार-पाच वर्षाच्या काळात याठिकाणी येणाऱ्या भावीकात  मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून अमावस्येला या ठिकाणी भाविकांची रीघ लागलेली असते.मात्र पोलीस प्रशासन मनुष्य बळ उपलब्ध नसल्याचे कारण देत वाहतूक पोलीस नियुक्त करीत नसल्याने भाविकांना शनिवार रविवार व सुट्टीच्या दिवशी ट्रॅफिक जाम चा फटका बसत आहे. वारंवार गडावर ट्रॅफिक जामुळे भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याने प्रशासनाने वाहतूक पोलिसांची व्यवस्था करावी अशी मागणी भाविक वर्गातून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here