देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
राहुरी तालुक्यात पोलिसांचा धाक न राहिल्याने चोऱ्यांचे प्रमाण वाढत चालल्याने पोलिसांनी ह्याची गंभीर दखल घेऊन त्वरित न्याय न दिल्यास पोलीस खात्या विरोधात तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा उंबरे येथील शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या समोर मांडल्या त्यावेळी हा इशारा दिला.
उंबरे ब्राह्मणीसह चार गावातील शेतकऱ्यांच्या विहिरीतील मुळा उजवा कालव्यावरून १०० च्या आसपास विद्युत मोटारी केबल चोऱ्या झाल्या आहेत. तालुक्यातील उंबरे, ब्राह्मणी, मोकळ ओव्हळ, चेडगाव ह्या गावातील शेतकऱ्यांच्या १०० च्या वर विद्युत मोटार केबल स्टार्टर, चाप कटर, जनरेटरच्या चोऱ्या होऊनही त्याचा अद्याप तपास न लागल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी उंबरे येथे आज आपल्या व्यथा माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या समोर मांडल्या.
यावेळी डॉ. तनपुरे कारखान्याचे चेअरमन नामदेव ढोकणे, सरपंच सुरेश साबळे, माजी संचालक साहेबराव दुशिंग, माजी संचालक सुनील अडसूरे, किसन पटारे, गोरक्षनाथ देवरे, अशोक ढोकणे, नामदेव म्हसे, भाऊसाहेब व्यवहारे आदिसह प्रमुख शेतकरी उपस्थित होते.
माजी खासदार प्रसाद तनपुरे यावेळी म्हणाले कि, गुन्हेगारांवर पोलिसांचा अजिबात धाक राहिलेला नसून पोलिसांच्या संगनमताने अश्या घटना घडत आहे. तालुक्यात पोलिसांची संख्या अपुरी आहे. गावे ९६ तर अवघे ४० पोलीस आहेत. पेट्रोलिंगसाठी स्वतंत्र गाडी नाही. अश्या अनेक समस्या जरी असल्या तरी पोलिसांनी लक्ष देऊन तपास लावला पाहिजे.
उंबरे चेडगाव मोकळ ओव्हळ, ब्राह्मणी परिसरातील शेतकऱ्यांच्या १०० च्या वर पाण्यातील विहिरीतील विद्युत मोटारी केबल चोरी झाल्या अनेक शेतकऱ्यांचे चाप कटर, जनरेटर मोटार सायकल चोरी झाल्यात. याचा तपास लागावा, त्यासाठी पोलिसांनी विनंती करणार नाही.
शेतकरी आधीच आर्थिक नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडला आहे. त्यात अतिवृष्टीची मदत देण्याबाबत शासन पालकमंत्री तारखेवर तारखा देत आहे. पण ती मदत अद्याप मिळत नाही. मदत मिळण्यासाठी उपस्थित डॉ. तनपुरे कारखान्याचे चेअरमन नामदेव ढोकणे यांनी आपल्या पाहुण्याकडे आग्रह धरावा असे सांगितले.
प्रस्ताविक भाषणात माजी संचालक सुनील अडसूरे म्हणाले की, गेल्या काही दिवसापासून उंबरे व परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे विहिरीवरील कालव्यावरील विद्युत मोटारी केबल बॉक्स, स्टार्टर चोरी होत आहे. उजव्या कालव्याला जेव्हा पाणी सुटते. तेव्हा शेतकरी आपल्या विद्युत मोटारी केबल आणून बसवितात व शेतीला पाणी घेतात. ह्या मोटारी केबल कापून काही चोरटे ह्या मोटारी चोरून नेत आहेत.
अश्या घटना गेल्या अनेक महिन्यापासून विशेषतः नदी पात्रातील वाळू मुरूम वाहतूकीस बंदी आल्यापासून हे प्रकार वाढत चालले आहे. बेकायदा वाळू मुरूम वाहतूक बंद झाल्याने त्यांचे धंदे बंद झाल्याने ही मंडळी ह्या चोऱ्या माऱ्या करण्याकडे वळले आहे. ही मंडळी व्यसनाधीन असल्याने चोऱ्या करण्या शिवाय दुसरा पर्याय न राहिल्याने हे प्रकार गेल्या चार ते पाच महिन्यापासून वाढले आहे.
याबाबत पोलिसांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय न दिल्यास कोणतीही पूर्व सुचना न देता राहुरी सोनई रस्ता रोको केला जाईल. यात सर्व पक्ष गट तट सहभागी होऊन आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सुनील अडसूरे ह्यांनी दिला.
एका संतप्त शेतकऱ्याने सांगताना म्हणाले की, माझी पाण्यातील विद्युत मोटार जेव्हा चोरीला गेली. त्यावेळी तक्रार देण्यास गेलो असता पोलिसांनी तक्रार घेण्या ऐवजी अनेक प्रश्न विचारून हैराण केले. त्यावेळी पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर आज ही परिस्थिती उदभवली नसती. ह्या सर्व घटनेस पोलीस प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला.
पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे यांनी पोलीस आपल्या बरोबर आहे. तुमच्या तक्रारीची तीव्र दखल घेतली असून पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांनी तालुक्यातील विविध गावातील भंगार वाल्यांच्या दुकानावर धाडी टाकून त्यांची चौकशी सुरु केली आहे. गावागावातील चोरीचे सत्र थांबविण्यासाठी प्रत्येक गावात ग्राम सुरक्षा पथक तैनात करावे. चोऱ्या माऱ्या होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः लक्ष द्यावे, विद्युत पंपाला सेन्सर बसवून घ्यावे आदि सूचना केल्या. पोलिसाच्या व्यथा अडिअडचणी त्यांनी यावेळी मांडल्या.
या बैठकीत अप्पासाहेब ढोकणे, भाऊराव ढोकणे, कुंडलिक ढोकणे, मच्छिन्द्र ढोकणे, उत्तमराव ढोकणे, गंगाधर अडसूरे, भाऊ सातवडे, दिपक ढोकणे, बाबासाहेब ढोकणे, बाळासाहेब हापसे, सरपंच सुरेश साबळे, बाबुराव ढोकणे गोपाळा कडू, विजय माळवदे ह्यांनी सहभागी होऊन आपल्या तक्रारीचा पाढा वाचला.
माजी खासदार प्रसाद तनपुरे ह्यांचा सत्कार डॉ तनपुरे कारखान्याचे चेअरमन नामदेव ढोकणे यांनी केला. आभार प्रदर्शन आप्पासाहेब ढोकणे यांनी मानले