सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात विदयाभवन शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

0

संगमनेर  : अमृत सांस्कृतिक मंडळ संचलित सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात प्राथमिक व माध्यमिक विदयाभवन, अमृतनगर या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम विदयाभवनच्या मुख्याध्यापिका श्रीमती संगिता म्हस्के, प्राथमिक विद्याभवनच्या मुख्याध्यापिका श्रीमती अर्चना आंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक शाळेच्या मैदानावर पार पडला.
         दिनांक १७ जानेवारी रोजी सकाळी कु. स्नेहल मच्छिंद्र दिघे M.S.(U.S.), Tesla (California, U.S) हिने माझ्या जीवनातील उंच भरारी या विषयावर विद्यार्थ्यांना व्याख्यान देवून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास व भविष्यातील ध्येयावर मार्गदर्शन केले तसेच सायंकाळी विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम झाले. यात विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर करून आपले कलागुण व कौशल्य सर्वांसमोर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यामध्ये गीत गायन , नृत्य , नाट्य सादर केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साखर कारखान्याचे सेक्रेटरी किरण कानवडे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन संतोष हासे उपस्थित हे होते.दिनांक  १८ रोजी सकाळी कोतुळेश्वर विदयालय कोतुळ या शाळेचे माजी प्राचार्य रामनाथ लक्ष्मण बोर्‍हाडे यांनी श्रध्दा हवी अंधश्रध्दा नको या विषयावर व्याख्यान देवुन अंधश्रध्दा निर्मूलनचे प्रबोधन केले. तसेच सायंकाळी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यात  डॉ सोमनाथ मुटकुळे व सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतापराव ओहोळ यांचे शुभहस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले. सर्व कार्यक्रमांना साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर ,लेबर ऑफिसर मा. शरद गुंजाळ , अमृत सांस्कृतिक मंडळाचे कार्याध्यक्ष रामदास तांबडे, सेक्रेटरी संदिप दिघे, खनिदार अशोक कवडे व संचालक मंडळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती संगिता म्हस्के, प्राथमिक विदयाभवनच्या मुख्याध्यापिका श्रीमती अर्चना आंबरे यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. या कार्यक्रमाचे निवेदक म्हणुन जैनुद्दीन तांबोळी यांनी काम पाहिले . एकुणच सर्वांच्या स्मरणात राहिल असा हा दोन दिवसाचा कार्यक्रम होता. वरील कार्यक्रमांचे यशस्वीते साठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचायांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here